सर्दी, ताप, खोकला, घसादुखी असे आजार झाल्यावर गुळवेलाच्या काढ्याचे सेवन केल्याने आराम मिळतो हे आपल्याला माहित असेलच आज आपण गुळवेल काढा कसा बनवायचा आणि गुळवेल काढ्याचा वापर वेगवेगळ्या आजारांपासून स्वताचा बचाव करण्यासाठी कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.
गुळवेलमध्ये एन्टीऑक्सिडेंट, एन्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यासोबत लोह, फॉस्फरस, तांबे, कॅल्शियम, झिंक, मॅंगनीज यांसारखे पोषक घटक गुळवेलमध्ये असतात. कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेल सगळ्यात जास्त गुणकारी असतो. आता आपण गुळवेल काढा कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
गुळवेलचा काढा बनवण्यासाठी 50 ग्राम गुळवेलच्या कांड्याचे हाताने बारीक तुकडे करून 1 लिटर पाण्यात मिसळा त्यानंतर ते भांडे गॅसवर ठेऊन चांगले उकळून आटू द्या. अर्धे राहिल्यावर खाली उतरून थंड होऊद्या. अशा प्रकारे आपला गुळवेल काढा तयार आहे.
पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला, घसादुखी असे आजार होऊ नये यासाठी आपण 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा गुळवेल काढा दिवसातून 3 वेळा घेतल्याने आराम मिळतो.
गुळवेल काढ्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. का’वीळ हा आजार झाल्यावर कपभर पाण्यात चमचे मध आणि 1 चमचा गुळवेल काढा टाकून दिवसातून 2 वेळा प्या.
गुळवेल काढ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध आणि हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी गुळवेल काढ्याचे सेवन 2 दिवसाआड केले तर फायदा होईल. गुळवेल काढ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे संतुलन व्हायला मदत मिळते. डायबेटीस रुग्ण गुळवेल काढ्याचे सेवन करू शकतात.
गुळवेल काढ्याचे सेवन केल्याने भूक वाढायला मदत होते. आपल्याला गुळवेल आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.