गुडघेदुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल गुडघेदुखीची समस्या अगदी सर्वसामान्य झाल्याचे आपण बघतोय. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर झाल्याने, युरीक एसिड वाढल्याने गुडघे दुखत असल्यावर कोणकोणते घरगुती उपाय केल्याने आराम मिळू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

गुडघेदुखी पासून आराम मिळण्यासाठी जेवण केल्यावर अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर 15 दिवस खा. असे केल्याने गुडघेदुखी थांबते. रात्री झोपायच्याआधी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने सांधेदुखी पासून आराम मिळतो.

सकाळी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारायला मदत होते. रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे झाल्याने सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास होत नाही.

गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी आपण तुळशीच्या रसाचे करू शकता यासाठी एक चमचा तुळशीच्या पानांचा रस काढून एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. रोज असे केल्याने दुखण्यापासून आराम मिळेल. अक्रोड, बदाम, शेंगदाणे, दुध आणि दुधाचे पदार्थ खाल्याने कॅल्शियमची कमतरता दूर व्हायला मदत मिळते.

सकाळी चालायला गेल्यानंतर चालून झाल्यानंतर थोडा वेळ पायांना स्ट्रेच करा. स्ट्रेच केल्याने वेदना कमी व्हायला मदत होईल. जास्त वेळ उभे राहून काम करणे टाळा.

आपल्याला गुडघेदुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page