छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिर

गोवा म्हंटल की बिच, चर्च याच गोष्टी सर्वप्रथम डोळ्यासमोर दिसतात. गोवा हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. याच गोव्यामध्ये पाहण्यासारखी अनेक मंदिरे आहेत. परंतु माहिती अभावी अशा सुंदर ठिकाणी जाणे होत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज्यानी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले. मग त्यात गोवा हे राज्य कसे चुकेल. याच गोव्यात महाराज्यांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. परंतु आज हे मंदिर पर्यटनासाठी अपरिचित राहीले आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोव्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोवा हे राज्य एकेकाळी कदंब राजवटीचा भाग होते. याच कदंबांचे सप्तकोटेश्वर हे तीर्थक्षेत्र होते. त्याकाळी हिंदुस्थानात असलेले पोर्तुगीज मंदिरांची विटंबना करत.

या विटंबनेला हे मंदिर अपवाद कसे राहील. जुन्या मंदिराची विटंबना झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याचा उल्लेख याच मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेल्या शिलालेखात आहे.

नार्वेतील हे मंदिर पणजीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या समोर एक वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ पाहायला मिळते. मंदिरात असलेल्या शिलालेखवर लिहलेला मजकूर म्हणजे, शके 1590 मध्ये महाराज्यांच्या आदेशानुसार या मंदिराचे बांधकाम सुरू केले. या मंदिराचा वारंवार जीर्णोद्धार होत आला आहे.

मंदिराचा सभामंडप भव्य असून संपूर्ण पांढऱ्या रंगानी हा रंगविला आहे. मंदिरात गणेश मूर्ती, नागशिल्प, सप्त धातूंपासून बनलेले शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये होत असलेला प्रमुख उस्तव म्हणजे गोकुळाष्टमी. मंदिराचा आवरा तसा भव्य आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरील आवारात काही जुन्या भग्न वास्तू दिसतात.

शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोव्यातील सुंदर मंदिराला भेट द्यायला विसरू नका. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.  आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page