आपण खालेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर युरीक एसिड हा टाकाऊ पदार्थ शरीरात तयार होतो. आपल्या शरीरात तयार झालेले युरीक एसिड लघवी द्वारे शरीराबाहेर टाकले जाते. आपल्या आहारात प्युरीन घटक असणारे अन्न पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास त्यामुळे आपल्या शरीरात युरिक एसिडचे प्रमाण वाढून गाउट हा आजार होण्याची शक्यता असते.
युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा होतात, त्यामुळे सांध्यांना सूज येते. याला गाउट म्हणतात. हाता पायाच्या बोटांना प्रचंड वेदना होणे, हाताच्या बोटांना सूज येते आणि तीव्र वेदना होतात, गुडघेदुखी, सांधेदुखी याशिवाय युरिक एसिड वाढल्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो, आता आपण शरीरात युरीक एसिड वाढण्याची कारणे समजून घेऊयात.
प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे, आहारात जास्त प्रमाणात लाल मांस, सीफूड, मसूर, राजमा, मशरूम, वाटाणे यांचा समावेश असल्यास, किडनीचे आजार असल्यास, डायबेटीस असल्यास, हायपोथायरॉईडीझम म्हणजेच कमी थायरॉईडमुळे यूरिक एसिड वाढण्याची शक्यता असते.
शरीरात वाढलेले युरीक एसिड कमी होण्यासाठी आपण हे काही घरगुती उपाय करू शकता. रिकाम्यापोटी कोमट पाण्यात ओवा पावडर अर्धा चमचा मिसळून हे पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक एसिड कमी व्हायला मदत मिळते.
आपल्या आहारात फळे, भाज्या आणि फायबरयुक्त धान्यांचा वापर करा. शरीरात वाढलेले युरीक एसिड कमी होण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
आपल्याला गाउट आजार होण्याची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.