सीताफळ खाल्याने मिळणारे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

सीताफळ हे अतिशय चविष्ट फळ आहे. सीताफळाचा हंगाम ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान म्हणजे अश्विन ते माघ महिन्यादरम्यान येतो. आयुर्वेदामध्ये सीताफळाला पित्तशामक, त्रिगुणनाशक, वमनरोधक, पौष्टिक, वी’र्यवर्धक, रक्तवर्धक, वातदोषनिवारक आणि हृदयासाठी अत्यंत हितकारक असल्याचे सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असणारे पोषक घटक सीताफळामध्ये असतात. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी सीताफळाचे सेवन अवश्य करावे.

सीताफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. सीताफळाचे सेवन नियमित केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. एसिडीटी, अपचन असे त्रास असणाऱ्यांनी सीताफळाचे सेवन अवश्य करावे सीताफळाचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी व्हायला मदत मिळते.

थोडे परिश्रम केल्यावर लगेच थकवा येत असल्यास अशक्तपणा जाणवत असल्यास सीताफळाचे सेवन अवश्य करावे. हाडे, दात मजबूत होण्यासाठी आवश्यक असणारे सगळे पोषक घटक सीताफळामध्ये असतात.

शारीरिक कमजोरी असलेल्या पुरुषांनी सीताफळाचे सेवन केल्याने त्यांची शारीरिक कमजोरी दूर व्हायला मदत मिळते. तसेच सीताफळ हे वीर्यवर्धक असल्याने पुरुषांची शारीरिक क्षमता देखील वाढते.

सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. सीताफळाचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. ग’र्भवती स्त्रियांनी सीताफळाचे सेवन केल्यास त्यांच्या गर्भाची वाढ चांगल्याप्रकारे होते.

सीताफळाच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून शेळीच्याा दुधात मिसळून आपल्या डोक्यावर लेप लावल्याने केस नव्याने उगवायला लागतात, केसांमधील कोंडा नाहीसा होतो, केस गळणे थांबते. केसांमधील उवा घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय प्रभावी आहे.

आपल्याला सीताफळ खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे  हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page