बाजारातून सफरचंद खरेदी करताना घ्यावयाची काळजी, गोड सफरचंद कसे ओळखायचे?

सफरचंद खायला सगळ्यांनाच आवडत. सफरचंदामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि फायबर घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. डॉक्टर देखील आपल्याला दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात, जे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

बाजारात वेगवेगळ्या प्रकारची सफरचंद बघतो, त्यापैकी कोणते सफरचंद गोड आणि आरोग्यदायी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते. म्हणूनच आज आपण अश्या काही ट्रिक जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण सफरचंद गोड आहे की नाही हे न कापताच ओळखू शकाल.

सफरचंद विकताना प्रत्येक दुकानदार सफरचंद गोड असल्याचे सांगतो, पण घरी घरी आल्यावर जेव्हा आपण ते सफरचंद कापून खायला घेतो तेव्हा ते गोड लागत नाही, त्यामुळे माहिती संपूर्ण वाचा.

सफरचंद विकत घेताना, सफरचंदावर लाल रेषा दिसतात का ते पहा सफरचंदावर लाल रेषा असल्यास अथवा सफरचंद पूर्णपणे लाल रंगाचे असेल तर ते सफरचंद खूप चवदार, गोड आणि रसाळ असेल.

जर सफरचंदावर थोडासा पिवळसरपणा असेल तर सफरचंद खूप गोड असेल परंतु त्यामध्ये रस कमी प्रमाणात असू शकतो. सफरचंद खरेदी करताना हलक्या हाताने दाबून पहा, जर ते हाताला मऊ लागत असेल तर त्यामध्ये रसाचे प्रमाण कमी असू शकते.

सफरचंद विकत घेत असताना लक्षपूर्वक बघा त्याच्या एका बाजूने दाबत असल्यास असे सफरचंद खरेदी करू नका, ते आतून खराब असण्याची शक्यता जास्त असते. सफरचंदावर डाग असल्यास असे सफरचंद खरेदी करू नका. ते आतून खराब असण्याची शक्यता असते.

सफरचंद नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्यास त्यामध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असतो. तसेच असे सफरचंद रसाळ असते. मात्र सफरचंद पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला असल्यास असे सफरचंद कापल्यानंतर आतून खराब असू शकते.

सफरचंद सेवन केल्याने त्वचेचे आजार बरे व्हायला मदत मिळते, तसेच सफरचंद जळजळ, हृदयविकाराचा झटका, ताप, बद्धकोष्ठता या समस्यांमध्ये फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त आपल्याला अजून एखादी ट्रिक माहित असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

आपल्याला गोड सफरचंद कसे ओळखायचे? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page