कलिंगड कापल्याशिवाय ते गोड आहे का नाही कसे ओळखायचे?

ह्या वर्षी उन्हाळा तीव्र आहे. तहानेमुळे सारखा घसा कोरडा पडतोय. अशा वेळी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी चवीला गोड असणारे आणि शरीराला तरतरी आणणारे कलिंगड खायचा विचार आपण करत असाल तर बाजारात कलिंगड खरेदी करायला जायच्या आधी ह्या काही टिप्स नक्की वाचून जा. ह्या टिप्सच्या मदतीने आपण चांगले, गोड, लाल आणि स्वादिष्ट कलिंगड ओळखू शकाल.

कलिंगड शेतात असताना जमिनीवर ठेवल्यामुळे त्याच्या एका बाजूला पिवळा डाग असतो. पिवळा डाग असलेले कलिंगड चांगले असते. जेव्हा तुम्ही कलिंगड विकत घ्याल तेव्हा त्यावर पिवळे डाग पाहायला विसरू नका.

कलिंगड खरेदी करताना दोन सारख्याच आकाराची कलिंगड हातात घेऊन बघा. जो कलिंगड चवीला गोड आणि आतून लाल असतो तो वजनदार असतो.

कलिंगड खरेदी करताना ज्या कलिंगडाचा रंग गडद आहे ते कलिंगड खरेदी करा. चवीला गोड आणि लाल कलिंगड हे गडद रंगाचे असतात.

कलिंगडावर हात मारून देखील कलिंगड चांगले पिकलेले आहे कि नाही हे ओळखता येते. चांगल्या पिकलेल्या कलिंगडामधून जास्त आवाज येतो. तर न पिकलेल्या कलिंगडाचा आवाज कमी येतो.

कलिंगड घेतांना कलिंगडाचे देठ जर हिरवे असेल तर ते चुकून ही घेऊ नका कारण हिरवा देठ म्हणजे कलिंगड पूर्णपणे पिकण्याआधीच ते तोडण्यात आलेल आहे. म्हणून सुकलेला देठ असलेले कलिंगड निवडा जेणेकरून ते आतून लाल आणि चवीला गोड राहील.

आपल्याला कलिंगड कापल्याशिवाय ते गोड आहे का नाही कसे ओळखायचे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आपण आधीपासून आवळ्याचा ज्यूस पित असाल तर आपल्याला त्यामुळे कोणकोणते फायदे झाले हे हि कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page