गुळवेल आरोग्यदायी फायदे, गुळवेल काढा कोण कोणत्या आजारासाठी घेता येऊ शकतो?

आपल्या पूर्वजांना अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती माहित होत्या म्हणून त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे फार कमी वेळा जाव लागायचं. आज आपण अश्याच एका औषधी वनस्पतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

फोटो आणि टायटल बघून आपल्या लक्षात आलेच असेल कि ज्या वनस्पतीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तिचे नाव काय आहे. (आपल्या भागात जर ह्या वनस्पतीला काही वेगळ नाव असेल तर कमेंटमध्ये सांगाल).

फोटोमध्ये दाखवलेल्या वेलाचे नाव आहे गुळवेल ज्याला संस्कृतमध्ये गुडूची असे म्हणतात तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये गिलोय असे म्हणतात.

गुळवेलमध्ये गिलोइन नावाचे ग्लुकोसाइड आणि टिनोस्पोरिन, पामेरिन आणि टिनोस्पोरिक ऍसिड हे घटक असतात. याशिवाय गुळवेलमध्ये कॉपर, आयरन, फॉस्फोरस, जिंक, कॅल्शियम आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळत.

गुळवेलचा काढा बनवून आपण त्याचा वापर करू शकता. गुळवेलचा काढा बनवण्यासाठी साधारणपणे  50 ग्राम गुळवेल घ्या. त्यानंतर एका पातेल्यात एक लिटर पाणी घ्या त्यामध्ये गुळवेल बारीक करून टाका.

नंतर पातेले गॅसवर ठेवून चांगले उकळू द्या. पाणी अर्धे झाल्यानंतर पातेले खाली उतरवून घ्या. नंतर तयार झालेला काढा गाळून घ्या. नंतर काढा हलकासा कोमट असतानाच अर्धा कप भर एका वेळी इतका आपण घेऊ शकता. ( गुळवेल काढा उष्ण गुणधर्म असणारा असल्याने त्याचे सेवन अतिप्रमाणात करू नका)

गुळवेल काढा टाइप-2 डायबेटीज असल्यास आपण घेऊ शकता. गुळवेल काढा प्यायल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला मदत मिळेल.

गुळवेल काढा घेतल्याने ताप कमी व्हायला मदत मिळते. घसा दुखत असल्यास, खोकला येत असल्यास आपण दिवसातून तीन वेळा 2 चमचे गुळवेल काढा दोन दिवस घेऊ शकता. असे केल्याने आपल्याला आराम मिळू शकतो.

आपल्याला बद्धकोष्ठता, ऍसिडिटी अशा आरोग्य समस्या असल्यास आपण चमचा भर गुळवेल काढा सकाळी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. नियमित चमचा भर गुळवेल काढा कोमट पाण्यासोबत घेतल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

आपल्याला गुळवेल आरोग्यदायी फायदे, गुळवेल काढा कोण कोणत्या आजारासाठी घेता येऊ शकतो?  हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page