घशात माशाचा काटा अडकला तर ह्या घरगुती उपाय मिळेल लगेच आराम

आपल्याला मांसाहार करायला आवडत असेल आणि आपल्याला मासे खायला आवडत असेल तर आपल्या हि कधी कधी माश्याचा काटा अडकला असेल घश्यात माश्याचा काटा अडकल्यावर घश्यात खूप वेदना होतात. अशावेळी नेमके कोणते उपाय केल्याने आराम मिळू शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

घशात माश्याचा काटा अडकल्यावर अशावेळी पिकलेली केळी खाल्याने घश्यात अडकलेला माश्याचा काटा निघून जाईल. आणि आपल्याला आराम मिळेल. शिजवलेल्या भातामध्ये तूप मिसळून लहान लहान गोळे बनवून खाल्याने घश्यात अडकलेला काटा निघून जायला मदत होते.

घश्यामध्ये माश्याचा काटा अडकल्यावर जोरा जोराने खोकल्यासारखे केल्याने सुद्धा घश्यात अडकलेला माश्याचा काटा बाहेर निघू शकतो. बऱ्याच माश्यांचे काटे हे लहान असतात त्यामुळे ते व्यवस्थित काढून मगच मासे खाणे सगळ्यात सोपा पर्याय आहे. घशात माश्याचा काटा अडकल्यावर अशावेळी आपण सुका ब्रेड खाल्ला तर घश्यात अडकलेला काटा निघून पोटात जातो.

इथून पुढे घश्यामध्ये माश्याचा काटा अडकला तर घाबरून न जाता यापैकी एखादा प्राथमिक उपाय आपण करून बघू शकता. मात्र या प्राथमिक उपायाने आपल्याला आराम न मिळाल्यास आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांची मदत घ्या.

अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page