घसादुखी, घशात खवखव होणे घरगुती उपाय

वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला आणि घसादुखी होण्याचे प्रमाण सध्या वाढताना आपल्याला दिसत आहे. घसा दुखत असल्यास अन्नपाणी खाणे हि अवघड होऊन जाते; म्हणूनच आज आपण घसादुखी आणि घशात खवखव होणे यावर घरगुती प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण घसादुखी होण्याची काही मुख्य कारणे जाणून घेऊयात.

अचानक थंड पाणी प्यायल्याने किंवा थंड अन्नपदार्थ खाल्ल्याने बऱ्याचदा घसादुखी होत असते. टॉन्सिल हा घशाचा एक महत्त्वाचा भाग असतो. टॉन्सिल हे आपल्या शरीरात जीवाणूंना जाण्यापासून रोखण्याचे कार्य करत असतात. बऱ्याचदा टॉन्सिल्समध्ये संसर्ग झाल्यामुळे घशात सूज आणि वेदना होत असतात, तसेच घसा खवखवतो.

वातावरणातील धूळ आणि गाड्यांच्या धुरासोबत आपल्या घशात अनेक घटक जात असतात म्हणूनच बाहेर जाताना तोंडाला मास्क, किंवा स्कार्फ बांधणे गरजेच आहे.

घसा दुखत असल्यास एक ग्लास पाण्यात दोन छोटे चमचे मीठ टाकून उकळून घ्या. हे पाणी उकळल्यानंतर खाली उतरवून घ्या. साधारण कोमट असतानाच ह्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय केल्याने आपला घसा मोकळा होऊन जाईल.

घश्यात खवखव होत असल्यास थोडेसे आले ठेचून पाण्यात मिसळून ते उकळून घ्या नंतर ते पाणी प्या. आपल्या घशात होणारी खवखव थांबून आपल्याला आराम मिळेल.

घसादुखी थांबण्यासाठी आपण जेष्टमधाची काडी चघळू शकता. जेष्टमधाची काडी चघळल्याने खोकला देखील कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला घसादुखी, घशात खवखव होणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page