घश्यात खवखव होणे, घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

घश्यात खवखव होत असल्यास त्यामुळे आवाज बसतो, अन्न गिळण्यात अडचण येते, पावसाळ्यात दुषित पाणी प्यायल्याने, थंड अन्नपदार्थ खाल्याने, बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्याने घश्यात खवखव होत असल्यास नेमके कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकता याविषयी आज जाणून घेणार आहोत.

घश्यात खवखव होत असल्यावर सगळ्यात पहिले कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसादुखी कमी होईल. घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी आल्याचा छोटा तुकडा किसून पाण्यात टाकून उकळून घ्या. नंतर ते पाणी कोमट असताना त्यामध्ये थोडे मध मिसळून प्या असे केल्याने आपल्याला आराम वाटेल.

कोमट पाण्यात चमचाभर अपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने घसादुखी कमी व्हायला मदत मिळते. तसेच नियमितपणे कोमट पाण्यात अपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने वजन देखील कमी व्हायला मदत मिळते.

घसादुखी, सर्दी, खोकला आणि कफ अशा समस्या उद्भवल्यास 1 कपभर पाणी घ्या त्यामध्ये दालचिनीचे लहान लहान तुकडे मिसळून चांगले उकळून घ्या.

नंतर हे पाणी गाळून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून हे पाणी प्या असे केल्याने आपल्याला आराम वाटेल. आपल्याला घश्यात खवखव होणे, घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page