बदलत्या वातावरणामुळे, अति थंड पदार्थ खाल्याने, आंबट पदार्थ, फ्रीजमधले गार पाणी प्यायल्याने, तेलकट पदार्थ खाल्याने घसा दुखू लागतो. आज आपण या लेखात घसादुखी पासून आराम देणारे काही घरगुती उपाय पाहूयात. हा लेख संपूर्ण वाचल्यावर आपल्याला हि माहिती कशी वाटली हे कमेंटकरून नक्की सांगा.
घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी आपण हा सोपा उपाय करून बघू शकता यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घाला. या पाण्याने दिवसातून 4 ते 5 वेळा गुळण्या केल्यास घसा दुखी कमी होऊन आराम मिळतो.
तसेच हा उपाय केल्याने घशात होणारी खवखव थांबते. घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी आले उपयुक्त आहे. आल्याचा चहा प्यायल्याने घसा दुखी कमी होते.
तुळस अनेक आजारांवर गुणकारी आहे. कोमट पाण्यात 5 ते 6 तुळशीच्या पानांचा रस मिसळा. दिवसातून दोन वेळा या पाण्याचे सेवन केल्याने घसा दुखी थांबून आराम मिळतो. दाताखाली लवंग धरून त्याचा रस चघळत राहिल्याने घशामध्ये होणारी खवखव थांबू शकते.
घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची चार पाने घ्या. एक कप पाण्यात ही पाने टाका. हे पाणी उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी एका कपात गाळून घ्या. त्यात एक चमचा मध घाला. या पाण्याने गुळण्या करा असे केल्याने घसा दुखी कमी व्हायला मदत होईल.
लसून अनेक आजारांवर गुणकारी आहे. घसादुखी कमी करण्यासाठी लसणाची 1 पाकळी तोंडात ठेवून चघळा. हा उपाय केल्यास त्वरित घसादुखी पासून आराम मिळतो.
तसेच मध हे घसादुखी वर अत्यंत उपयुक्त आहे. कोमट पाण्यात मध घालून पिल्यास घसादुखी बरी होते. त्याच बरोबर एक चमचा मधात हळद घालून चाटण केल्यास घसा खवखवत नाही. हळद आणि मध घशाच्या आजारावर फायदेशीर आहे.
एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घाला. या पाण्याने रोज सकाळी गुळण्या करा. त्यामुळे घसा दुखी कमी होते. आपल्याला घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.