घसादुखी, घशात खवखव होणे यावर घरगुती उपाय

हवामान बदलांमुळे, अचानक थंड पदार्थ खाल्याने बऱ्याचदा घश्यात खवखव व्हायला लागते; घश्यात खवखव होत असल्यास रुग्णाला बोलणे हि अवघड होऊन जाते तसेच घसा दुखत असल्याने अन्न पाणी गिळताना हि त्रास होत असल्याने काही खाता हि येत नाही म्हणूनच आज आपण घसादुखी पासून आराम मिळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत.

या उपायांच्या मदतीने आपला घसा मोकळा व्हायला मदत होईल. घसा दुखत असल्यावर सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट गरम पाणी प्या; कोमट पाणी प्यायल्याने घसा मोकळा व्हायला मदत होते. त्यानंतर गरम पाण्यात थोडे खडे मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा.

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने देखील घश्याच्या वेदना कमी होऊन आराम मिळतो. दिवसभरात 3-4 वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसादुखी कमी होऊन आराम मिळतो.

आपल्या घरी जेष्ठमधाची काडी असेल तर तीचे एक दोन लहान तुकडे चघळा जेष्ठमधाची काडी चघळल्याने घसादुखीच्या वेदनेपासून आराम मिळतो. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने देखील घसादुखी कमी व्हायला मदत होते.

आल्याचा काढा किंवा कोऱ्या चहात आले मिसळून दिवसातून 2 वेळा प्या असे केल्याने खोकला, सर्दी, घसादुखी, घश्यात होणारी खवखव थांबते. गुळवेल काढा थोड्या प्रमाणात कोमट पाण्यासोबत घेतल्याने सुद्धा घसादुखी कमी व्हायला मदत होते.

आपल्याला घसादुखी, घशात खवखव होणे यावर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page