घरातील पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

घरातील भिंतीवर पाल दिसल्यावर लहानांपासून मोठ्यांना त्या पालीची भीती वाटते. घरात पाल असणे तसे एक प्रकारे आपल्या फायद्याच असत. पाल आपल्या घरातील छोटे कीटक खाऊन गुजराण करत असते.

मात्र कधी कधी स्वयंपाक घरातील एखादे भांडे उघडे राहिले आणि त्या भांड्यात पाल पडली तर असे पाल पडलेल अन्न खाणे आपल्यासाठी घातक ठरू शकत. म्हणूनच आज आपण घरातील पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

पालींचा घरातील वावर कमी करण्यासाठी काळीमिरी पावडर फार प्रभावी असते. घरातील ज्या ठिकाणी पालीचा वावर असतो त्या ठिकाणी काळ्यामिरीची पावडर टाका. अथवा झाडांना पाणी मा’रायच्या स्प्रे मध्ये काळ्यामिरीची पावडर आणि पाणी मिसळून स्प्रे करा. असे केल्याने पाली कमी होतील.

घरातील पालींना पळवून लावण्यासाठी आपण घरातील ज्या भागात पालीचा वावर आहे; त्या ठिकाणी  कांदा पातळ कापून ठेवा. कांद्याच्या उग्र वासामुळे पाल त्या ठिकाणी फिरकणार नाही. पालींचा घरातील वावर कमी करण्यासाठी आपण डांबर गोळ्यांचा देखील वापर करू शकता.

जेवणाची भांडी, खरकटे, कचरा यामुळे कीटक आपल्या घरात येत असतात त्यामुळे आपण घर जितके स्वच्छ ठेवाल तितके किडे, कीटक, झुरळ आपल्या घरात येण्याचा धोका कमी होतो.

आपल्याला घरातील पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आपण आधीपासून आवळ्याचा ज्यूस पित असाल तर आपल्याला त्यामुळे कोणकोणते फायदे झाले हे हि कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page