किचनमध्ये थोड काही गोड सांडल कि त्या ठिकाणी लगेच मुंग्या जमा होतात. मुंग्यांना गोड खायला आवडत. मुंग्यांपासून सोप्या पद्धतीने सुटका करण्याचे उपाय शोधत असाल तर या टिप्स तुम्हाला खूप मदत करू शकतात.
मुंग्यांना पळवून लावण्यासाठी एक लिटर पाण्यात मुठभर मीठ घालून उकळून घ्या. थंड झाल्यावर स्प्रेमध्ये भरा. जिथे मुंग्यांचा वावर जास्त असेल तिथे हे पाणी फवारा. असे केल्याने मुंग्या येणार नाहीत.
ज्या ठिकाणी मुंग्याचा वावर जास्त प्रमाणात असतो त्या ठिकाणी लिंबाची साल ठेवा. मुंग्यांना लिंबाच्या रसाचा वास आवडत नाही, त्यामुळे त्या त्यापासून दूर राहतात. लिंबाची, संत्र्याची साल सुकवून पावडर तयार करा हि पावडर मुंग्या येतात तिथे टाका. मुंग्या परत त्या जागी येणार नाही.
घरात कडुलिंबाचे तेल फवारल्याने मुंग्या आणि इतर कीटक येत नाहीत. ज्या ठिकाणी मुंग्यांचा वावर आहे त्या ठिकाणी कापराची वडी बारीक करून टाका. कापराच्या वासामुळे मुंग्या येत नाहीत.
आपल्याला घरातील मुंग्यांपासून सुटका करण्यासाठी रामबाण उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या कमेंटस आम्ही वाचत असतो त्यामुळे कमेंट नक्की करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.