आपल्या घरात माश्या असल्या कि घरातल्या माणसांना वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होते. माश्या बऱ्याचदा बाहेरच्या घाणीवर, उघड्या गटारीवर बसतात अन मग तश्याच आपल्या घरातील अन्न पदार्थांवर येऊन बसतात.
असे अन्न खाल्याने घरातील लहान मुल, वयोवृद्धांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून ते लवकर आजारी पडतात.म्हणूनच आज आपण घरातील माश्यांना पळवून लावण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत.
आपल्या घरात माश्या येऊ नये यासाठी संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात थोडासा भीमसेनी कापूर जाळा; कापराच्या धुरामुळे आपल्या घरात माश्या येणार नाही. माश्या येऊ नये यासाठी घरात धूप लावा.
आपल्या घरासमोर तुळशीचे झाड अवश्य लावा, तुळस असलेल्या ठिकाणी माश्यांचा वावर कमी असतो. घरात निलगिरी तेल स्प्रे केल्याने माश्यांचे प्रमाण कमी होते. माश्या येऊ नये यासाठी पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून ते आपल्या घरात स्प्रे करा. मिठाच्या पाण्याने घरातील माश्यांचे प्रमाण कमी होते.
घरात माश्या येऊ नये यासाठी घरात ज्या ठिकाणी जेवण बनवले जाते ती जागा स्वच्छ ठेवा, घरातील कचराकुंडीला झाकूण ठेवा, घरात जेवण केल्यानंतर खरकटे सांडले असल्यास त्वरित ते साफ करा. फळं, कापलेल्या भाज्या उघड्यावर ठेऊ नका. घरात कीटक, माश्या, मच्छर येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा.
घरातील माश्यांना पळवून लावण्यासाठी जबरदस्त उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.