उष्णतेमुळे येणाऱ्या घामोळ्या आणि खाजेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

उन्हाळ्यात आपण आपल्याला त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेच असत. उन्हाळ्यात आपल्या शरीरावर  अत्याधिक उष्णतेमुळे घामोळ्या येतात तसेच अंगाला खाज हि येते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. उष्णतेमुळे येणाऱ्या घामोळ्या आणि खाजेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

अंगावरील घामोळ्या घालवण्यासाठी काकडीचे काप घामोळ्यावरून फिरवा. अथवा काकडी किसून त्याचा लेप घामोळ्या आलेल्या भागावर लावा. असे केल्याने घामोळ्या कमी होऊन आपल्याला आराम मिळेल.

3 वर्षापुढील लहान मुलांच्या अंगावरील घामोळ्या कमी होण्यासाठी आपण त्यांच्या अंगाला रात्री झोपायच्या आधी कोरफड जेल किंवा कोरफड गर लावू शकता. कोरफड गर त्वचेवर लावल्याने घामोळ्या नाहीश्या होऊन आराम मिळेल. घामोळ्यावर दही लावले तरी घामोळ्या कमी होऊ शकतात.

घामोळ्यामुळे अंगाला खाज येत असेल तर कडूलिंबाच्या पानांची पेस्ट खाज येत असलेल्या भागावर लावा. कडूलिंबाची पेस्ट लावल्याने अंगाला येणारी खाज थांबेल.

उष्णतेमुळे अंगाला येणाऱ्या घामोळ्या पासून आराम मिळण्यासाठी बर्फाचे 2 ते 3 तुकडे घ्या आणि एका स्वच्छ सूती रुमालात गुंडाळा. आता या बर्फाच्या तुकड्यांनी हलक्या हातांनी घामोळ्या आलेल्या भागावर फिरवा. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

घामोळ्यामुळे अंगाला खाज येत असेल तर आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्याने अंघोळ करा. असे केल्याने अंगावरील खाज कमी होण्यास मदत मिळेल.

अंगावर घामोळ्या येऊन द्यायच्या नसतील तर दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि उन्हात बाहेर जाताना शरीर आणि चेहरा व्यवस्थित झाका. सुती कपडे वापरा. गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. अंघोळीसाठी कोमट अथवा गार पाण्याचा वापर करा. अंघोळीच्या पाण्यात एंटी बॅक्टेरियल लिक्विड मिसळून त्या पाण्याने अंघोळ करा.

आपल्याला उष्णतेमुळे येणाऱ्या घामोळ्या आणि खाजेपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page