ह्या वर्षी उन्हाळा अधिक तीव्र असल्या कारणाने दुपारचे अंग घामाने ओले होऊन निघतेय; घामामुळे अंगाला दुर्गंधी येते. आपल्यापैकी बरेच जण अंगाला दुर्गंधी येऊ नये यासाठी केमिकलयुक्त बॉडी स्प्रे वापरत असाल.
बॉडी स्प्रे मध्ये असणाऱ्या केमिकलमुळे अंगाला खाज येऊ शकते, आग होऊ शकते. म्हणूनच आज आपण घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
अंगाला येणारी घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी सकाळी अंघोळ करायच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्याने अंघोळ करा; असे केल्याने अंगाला घामाचा वास येणार नाही, घामामुळे खाज येत असेल तर ती देखील थांबेल. हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
अंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या पानांची पेस्ट मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्याने सर्व त्वचा रोग बरे व्हायला मदत मिळते तसेच अंगाला घामाचा दुर्गंध देखील येत नाही.
अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल मिसळून अंघोळ केल्याने अंगाला येणारा घामाचा वास जायला मदत मिळते. उन्हाळ्यात कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते.
उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे वापरू नका, पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरल्याने अंगाला कमी घाम येतो. आपल्याला घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.