गरोदर असताना अंड्याचे सेवन केले पाहिजे का?

गर्भवती महिलांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. समतोल आणि आरोग्यदायी आहारामध्ये अंड्यांचाही समावेश केला जातो त्यामुळे अनेक गरोदर महिलांना प्रश्न पडतो कि गरोदरपणात अंडी खावी की खाऊ नये म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गरोदर असताना अंड्याचे सेवन केले पाहिजे का?

अंड्यांमध्ये प्रोटीन, चरबी आणि खनिजे यांसारखी सर्व प्रकारची पोषक तत्वे असतात. कच्च्या आणि अर्धवट शिजवलेल्या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता खूप जास्त असते, ज्यामुळे गर्भवती महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता असते.

सामान्य लोक या कच्च्या किंवा अर्ध्या शिजवलेल्या गोष्टी सहजपणे खाऊ शकतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत असते परंतु गर्भवती महिलांच्या बाबतीत असे होत नाही.

गरोदरपणात महिलांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते.  कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात ज्यामुळे अनेक रोग होतात. या जीवाणूंमुळे अन्न विषबाधा, उलट्या, अतिसार, ताप येणे, डोकेदुखी, पोटदुखी अशा गोष्टी होऊ शकतात.

जर गर्भवती महिलेच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी आधीच जास्त असेल तर अंड्यातील पिवळ बलकामुळे समस्या वाढू शकतात. अंड्यांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, अंगावर पित्ताच्या गाठी येणे आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे गर्भवती असताना शक्यतो पूर्ण शिजवलेले अंडे आपण खाऊ शकता तसेच अंडी कमी प्रमाणात खाणेच आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरू शकते. आपल्याला गरोदर असताना अंड्याचे सेवन केले पाहिजे का? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page