गरम पदार्थ खाताना जीभ भाजल्यास करा हे घरगुती उपाय

कधीकधी आपण अनवधानाने किंवा घाईघाईने गरम पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम जीभेवर नंतर जाणवतो. गरम गरम खाताना घाईत आपली जीभ भाजते. आणि त्याचे बारीक फोड जीभेवर उठतात.

जीभ भाजल्यावर आपल्याला पाणी सुद्धा नीट पिता येत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय करून भाजलेल्या जीभेवर तुम्ही इलाज करू शकता. चला तर मग पाहूया काय आहेत घरगुती उपाय.

जीभ भाजल्यास सर्वात सोपा उपाय म्हणजे साजूक तूप लावणे. जळलेल्या भागावर साजूक तूप हे औषध म्हणून कार्य करते. त्यामुळे तुमच्या जीभेची जळजळ कमी होईल आणि तुमच्या जिभेला फोड येणार नाही.

दुसरा सोपा उपाय म्हणजे मध. यात प्रतिजैविक गुणधर्म आहेत जे जीभेवर झालेल्या इजा त्वरीत बरे करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

थंड दही हा जीभ भाजल्यानंतर लावण्यासाठी एक चांगला उपाय आहे. भाजलेल्या जिभेसाठी थंड दही मलम म्हणून काम करते. भाजलेल्या भागावर काही वेळासाठी दही तोंडात ठेवा. लवकरच फरक जाणवेल.

जीभ भाजल्यास साखर हा एक चांगला उपाय आहे. जेव्हा जीभ भाजेल तेव्हा आपल्या जीभवर साखर ठेवा आणि साखरेला स्वतःच विरघळू द्या. यामुळे भाजलेल्या जागेवर आराम मिळेल.

जीभ भाजल्यावर पुदिन्याची पाने चघळल्यास लावल्यास फरक जाणवतो. हे केवळ जीभेमध्ये थंडपणाची भावनाच देत नाही तर आपली वेदना ही कमी करेल. जीभेची जळजळ कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल.

फ्रीझरमधून बर्फ घ्या आणि भाजलेल्या जागी लावा जेणेकरून आपल्याला वेदना आणि जळजळीपासून आराम मिळेल. बर्फ हा भाजलेल्या जीभेवर एक उत्तम उपाय आहे. आपल्याला गरम पदार्थ खाताना जीभ भाजल्यास करा हे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page