गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर माहिती आणि आख्यायिका

आज आपण कोकण समुद्रकिनारी असणाऱ्या श्री गणेशाच्या भव्य मंदिराबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणांपैकी एक म्हणजे गणपतीपुळे. हे ठिकाण रत्नागिरी येथे समुद्रकिनारी वसले आहे.

येथे स्वयंभू लंबोदर गणेशाचे सुंदर मंदिर आहे. संगमरवरी गाभाऱ्यात स्थापन करण्यात आलेली सिंदुर चर्चित गणेश मुर्ती 400 वर्षांपूर्वीची आहे असे म्हटले जाते.

या मंदिराबाबत एक आख्यायिका फार प्रसिद्ध आहे. मोगलांच्या काळात भिडे नावाचे पुजारी येथे राहत होते. त्यावेळी एक संकट त्यांच्यावर कोसळले. हे संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करेल असा दृढनिश्चय करून त्यांनी गणेशाची उपासना सुरू केली.

त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन एके दिवशी त्यांना असा दृष्टांत झाला की भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रकट झालो आहे. त्यामुळे तू माझी येथे पूजा अर्चा कर.

त्यावेळी भिडे यांची गाय दूध देत नव्हती. गुराख्याला गायीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सध्या जेथे मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तेथे एकेकाळी एका शिळेवर गाईच्या स्तनातून दुग्धाभिषेक होत होता. ही गोष्ट ज्यावेळी गुराख्याने भिडे यांना सांगितली तेव्हा त्याच ठिकाणी भिडे यांना गणेश मूर्ती आढळली.

या ठिकाणी मंदिर उभारून पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली. पुढेही येथे छोटे मंदिर उभारण्यात. या गणेशास श्री लंबोदर गणेशाचे स्वरूप प्राप्त झाले. आज अनेक गणेश भक्त या ठिकाणी दर्शनास येतात. प्रत्येक गणेश भक्तांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे हा गणपती नवसाला पावतो अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

आपल्याला गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराची हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page