गणपती ला दुर्वा का वाहिली जाते?

गणपतीला दुर्वा अतिप्रिय आहे म्हणून आपण गणपतीला दुर्वा वाहत असतो. गणपतीला दुर्वा वाहण्यामागे असलेले कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला एक पौराणिक कथा समजून घ्यावी लागेल. अनलासुर नामक एका राक्षसाने तिन्ही लोकातील सर्व प्राणिमात्रांचा छळ करून त्यांच जगण मुश्कील केले होते.

अगदी देव सुद्धा त्याच्या तावडीतून सुटले नव्हते. अखेर कंटाळून सगळे देव गणपतीला शरण गेले. त्यांनी आपल्या सोबत घडलेलं गणपतीला सांगितलं ते ऐकताच क्षणाचाही विलंब न करता गणपतीने महाकाय रुप धारण केल आणि त्या अनलासुराला गिळून टाकल.

हा अनलासुर म्हणजे अग्नीचेच एक रूप होत. त्यामुळे त्याला गिळल्यानंतर गणपतीच्या संपूर्ण अंगाची आग – आग होऊ लागली. त्यामुळे गणपतीला त्रास होऊ लागला. आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळले आणि त्यामुळेच गणपतीला शारीरिक पीडा होत आहेत या जाणीवेने सगळे देव बेचैन झाले.

त्यांनी आपापल्या परीने गणपतीचा दाह शांत व्हावा, त्याला पुन्हा स्वास्थ्य लाभाव म्हणून विविध उपचार करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या वनौषधींचे लेप गणपतीच्या सर्वांगाला लावण्यात आला. वरुण देवतेने थंडगार जलवर्षाव केला. इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला.

ब्रह्मदेवाच्या ऋद्धी सिद्धी या दोन्ही कन्या गणपतीच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहून पंख्याने त्याला वारा घालू लागल्या. पण यापैकी कशाचा ही अनुकूल परिणाम होईना. गणपतीच्या या त्रासाची वार्ता सर्वदूर पसरल्याने अनेक ऋषी मुनी तपस्वी देखील त्या ठिकाणी आले.

त्या ऋषी मुनींनी गणपतीच्या मस्तकावर एकवीस दुर्वांच्या जुड्या ठेवल्या. या उपचाराने मात्र त्याचा दाह शांत झाला. आपली व्यथा दूर करणारा दुर्वा त्या दिवसापासून गणपतीला प्रिय झाला! गणपतीला दुर्वा प्रिय असण्याची अजून एक कथा पुराणात आढळते ती आपण उद्या जाणून घेऊयात.

आपल्याला गणपती ला दुर्वा का वाहिली जाते? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपल्याला हि माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये जय गणेश असे नक्की लिहा. आमच्या पोस्ट सगळ्या पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करून नोटीफीकेशन चालू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page