फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ करण्यासाठी उपाय

फुफ्फुस हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतात, गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे, कारखान्यांमधून निघणाऱ्या धूरामुळे, धुम्र’पाना केल्याने, वाढत्या वायुप्रदूषणामुळे, आपल्या फुफ्फुसामध्ये धुळीचे, धुराचे लहान लहान कण जमा होतात. ज्यामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात.

फुफ्फुस कमकुवत झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. म्हणूनच आज आपण फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेतल्याने श्वसन नलिका, फुफ्फुस साफ व्हायला मदत मिळते.

फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ करण्यासाठी दिवसातून दोन वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये असणाऱ्या एंटिऑक्सिडंट घटकांमुळे फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ व्हायला मदत मिळते.

आठवड्यातून 3 वेळा दालचिनी काढा प्यायल्याने फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ व्हायला मदत मिळते. आल्याचा कोरा चहा प्यायल्याने देखील फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ व्हायला मदत होते.

फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, बीटा कॅरोटीन असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. यात मोठ्या प्रमाणावर एंटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे फुफ्फुसं निरोगी राहण्यास मदत होते.

नियमित कपालभाती सारखे श्वासांचे व्यायाम केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. शारीरीक व्यायाम जसे कि सायकल चालवणे, धावणे, पोहणे, कार्डीओ अशा गोष्टी केल्याने फुफ्फुस मजबूत व्हायला मदत मिळते. आपल्याला फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ करण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page