फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी हे सोपे उपाय करा

फ्रीजचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. जेवणाशिवाय इतर स्वयंपाकघरातील वस्तूही त्यात ठेवल्या जातात. आपण खाण्या-पिण्याच्या वस्तू फ्रिजमध्ये या उद्देशाने ठेवल्या जातात जेणेकरून ते जास्त वेळ टिकेल. पण जर, फ्रिजमधून दुर्गंध येत असेल वास येत असेल तर त्या वस्तू खराब होण्याची जास्त शक्यता असते.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये येणारा हा दुर्गंध मिसळून जातो ज्यामुळे आपण जेव्हा पण फ्रिज उघडतो तेव्हा संपूर्ण फ्रिजमधून हा वास येत असतो.  म्हणूनच आज आपण फ्रिजमधील दुर्गंध दूर करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

फ्रिजचा दुर्गंध मोठ्या प्रमाणात येत असेल तर फ्रिजमधील सर्व सामान बाहेर काढा आणि मिठाच्या पाण्याने संपूर्ण फ्रिज आतून पुसून घ्या. हे केल्यानंतर किमान तीन ते चार तास फ्रिज उघडे ठेवा. असे केल्याने फ्रिजमधील दुर्गंध निघून जाईल.

फ्रिजमधील दुर्गंध दूर करण्यासाठी चमचाभर खाण्याचा सोडा छोट्याश्या वाटीमध्ये घ्या अन ती वाटी फ्रिजमध्ये ठेउन दया. असे केल्याने फ्रिजमधील दुर्गंध दूर होण्यास मदत मिळेल. फ्रीज साफ करण्यासाठी, एक कप पाण्यात एक चमचा सोडा मिसळा आणि स्वच्छ करा. यामुळे वास आणि डाग अदृश्य होतील.

फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचा वापर आपल्या फ्रीजचा दुर्गंध दूर करण्यासाठीही करू शकता यासाठी जेव्हा फ्रिजमधून वास येईल तेव्हा चमचाभर बेकिंग सोडा छोट्याश्या वाटीमध्ये घ्या अन ती वाटी फ्रिजमध्ये मागील बाजूस ठेउन दया.

बेकिंग सोडयाप्रमाणे कॉफीच्या काही बिया फ्रिजमध्ये ठेवल्यानेही दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते. यासाठी कॉफीच्या काही बिया एका वाटीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा असं केल्याने वास दूर तर होईलच सोबत फ्रिजला कॉफीचा सुगंध देखील येईन.

फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी पांढरे व्हिनेगर एका कपड्यावर घेउन त्याने फ्रिज चांगला पुसून घ्या. असे केल्याने फ्रिजचा दुर्गंध येणार नाही आणि फ्रीज चांगले स्वच्छ देखील होईल.

फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी वाटीभर पाण्यात थोडासा  लिंबाचा रस मिसळून घ्या आणि ते फ्रिजमध्ये ठेवा किंवा लिंबू अर्धे कापून फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील दुर्गंध निघून जाण्यास मदत मिळेल.

फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी वर्तमानपत्राचा ही वापर आपण करू शकतो. वर्तमानपत्र दुर्गंध शोषून घेतात. त्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू वर्तमानपात्रात गुंढाळून ठेवा अथवा नुसते वर्तमानपात्र जरी फ्रिजमध्ये ठेवला तरी चांगला परिणाम जाणवेल.

या बरोबरच  फ्रिजमधील कोणतीही सामग्री खराब झाली असेल किंवा ती सडली असेल तर ताबडतोब फ्रिजमधून बाहेर काढा.  वेळच्या वेळी फ्रिज साफ करा.

फ्रिजमध्ये वस्तू ठेवताना शक्यतो हवाबंद कंटेनर वापरा. फ्रिज मध्ये भाज्या , दूध ठेवताना जर सांडले तर त्वरित ते पुसून टाका जेणेकरून फ्रिज मधून दुर्गंध येणार नाही.

आपल्याला फ्रीजमधून येणारा वास दूर करण्यासाठी हे सोपे उपाय करा हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page