फिशर घरगुती उपाय

अवघड जागेचे दुखणे म्हणून बऱ्याचदा फिशर ह्या आजाराचा त्रास होत असल्यास डॉक्टरकडे जाणे टाळले जाते. फिशर म्हणजे गुदाभागात चीर पडणे. गुदाभागात चीर पडल्याने रक्तस्त्राव आणि प्रचंड वेदना होऊ शकतात. गुदाभागात चीर पडल्याने त्याठिकाणी जखम होण्याचा धोका असतो, खाज येऊ शकते.

हा आजार व्यवस्थित पोट साफ न होणाऱ्यांना होऊ शकतो. आहारात फायबर घटकांचा समावेश नसल्याने, एका जागेवर जास्तवेळ बसून काम करणाऱ्यांना, नियमित मांसाहार केल्याने शरीरात उष्णता वाढून सुद्धा हा आजार होऊ शकतो, स्त्रियांना बाळाच्या जन्मानंतर फिशर हा आजार होऊ शकतो.

याच बरोबर अती जागरण करणाऱ्यांना देखील हा आजारा होऊ शकतो. फिशर ह्या आजारावर वेळीच उपचार न केल्याने आजार जूना होत जातो. त्यामुळे त्वचेच्या जखमा आतमध्ये खोलवर वाढत जातात व ञासाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणूनच आज आपण फिशरचा त्रास कमी होण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

फिशरचा त्रास होत असल्यास एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये दिवसातून दोन वेळा बसावे. असे केल्याने त्याभागातील रक्ताभिसरण क्रिया वाढून जखम लवकर बरी होईल.

फिशरच्या जागेवर कोरफड गर दिवसातून 3 वेळा लावल्याने होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते. रात्री झोपताना फिशरच्या जागेवर थोडेसे नारळाचे तेल लावल्याने वेदना कमी व्हायला मदत मिळते.

फिशरचा त्रास होत असल्यास मांसाहार करणे थांबवावे, चहा, कॉफी पिणे, अतिगोड पदार्थ खाणे, अति मसालेदार, तिखट, मैदायुक्त पदार्थ खाणे थांबवावे. आपल्या आहारात फायबर घटक असणारे पदार्थ जसे कि फळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, मुळा, रताळे असे कंदमुळे खावे.

रात्रीचे जागरण करू नये, दिवसभरात शक्य तितके पाणी प्यावे, थोडासा का होईना शारीरिक व्यायाम करावा. आपल्याला फिशर घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉक्टर चा सल्ल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page