भारतातील पहिला रंगीत चित्रपट हा होता?

जगात सर्वात आधी भारतामध्ये चित्रपट सृष्टीचा पाया रचला गेला. सिनेमाचे जनक म्हणून आजही दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे चित्रीकरण करून हा भारतातील पहिला चित्रपट ठरला, परंतु हा ब्लॅक अँड व्हाइट मधील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून मुंबई भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू बनली. यावेळचे सर्व चित्रपट ब्लॅक ॲण्ड व्हाइट मध्ये होते.

रंगीत चित्रपटांमध्ये भारतातील पहिला चित्रपट होण्याचा मान “किसान कन्या” या चित्रपटाने घेतला आहे. या काळात चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एकमात्र साधन होते. 1937 मध्ये अर्धशीर इराणी यांनी चित्रपट सृष्टीमध्ये रंग टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

1937 मध्ये आलेला चित्रपट किसान कन्या हा भारतात तयार केलेला पहिला रंगीत चित्रपट होता. अर्धशीर इराणी हे या चित्रपटाचे निर्माते होते, तर मोती बी. गिडवानी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाची कथा सदत हसन मंटो  यांच्याद्वारे लिहलेल्या कादंबरीवर आधारित आहे.

या चित्रपटाची कथा एका गरीब शेतकऱ्यावर आधारित आहे. या चित्रपटात असलेला राम हा शेतकरी खूप गरीब आहे. त्याच्या घराचा मालक आणि जेथे तो काम करतो त्या शेतीचा मालक त्यांच्यावर अत्याचार करतो.

त्यानंतर या घर मालकाचा खू-न होतो आणि सर्व गावकऱ्यांना वाटते की रामने त्यांचा खून केला आहे. अशाप्रकारे या चित्रपटाची कथा आहे.

हा चित्रपट 137 मिनिटांचा असून यामध्ये यात 10 गाणी आहेत. या गाण्यांचे रेकॉर्डिंग ग्रामोफोनद्वारे करण्यात आले आहे. या चित्रपटात रंग भरून प्रेक्षकांच्या मनावरही चित्रपट सृष्टीचा रंग चढला आणि हा रंग अधिक गहरा होत जात आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page