इस्त्रीवरील डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

आपल्या प्रत्येकाच्या घरी इस्त्री हि असतेच बऱ्याचदा जाड कपडे इस्त्री करत असताना अचानक पातळ कपडा इस्त्री केल्यावर इस्त्रीला खालच्या बाजूने कपडा चिकटतो आणि डाग पडतात. इस्त्रीवर पडलेले डाग सहसा लवकर निघत नाही म्हणूनच आज आपण इस्त्रीवरील डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

इस्त्रीवर पडलेले डाग घालवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकतो यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट हाताने किंवा ब्रशने इस्त्रीवर लावा थोडा वेळ राहूद्या नंतर ब्रशने घासा.  आपली इस्त्री परत पहिल्या सारखी चकचकीत दिसू लागेल.

इस्त्रीवर पडलेले डाग आणि गंज घालवण्यासाठी आपण चुना आणि मिठाची पेस्ट इस्त्रीवर लावू शकता यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात चमचाभर चुना आणि चमचाभर मीठ त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. हि पेस्ट कपड्यावर घेऊन आपल्या इस्त्रीवर लावा. काही वेळ राहूद्या नंतर कपड्याने पुसल्यास इस्त्रीवरील घाण निघून जाईल.

इस्त्रीवर पडलेले डाग घालवण्यासाठी आपण मिठाचा देखील वापर करू शकता यासाठी एका सफेद पेपरवर मीठ पसरवा. त्यानंतर इस्त्री सुरु करून गरम झाल्यावर त्या पेपरवर 2 मिनिटे इस्त्री फिरवा. असे केल्याने इस्त्रीवर लागलेली घाण निघायला मदत मिळेल.

इस्त्रीवर लागलेली घाण काढण्यासाठी कोलगेटचा देखील वापर करता येऊ शकतो. ब्रशवर कोलगेट घेऊन ती इस्त्रीवर लावा. नंतर कपड्याने पुसून काढा. असे केल्याने इस्त्रीवरील जळलेले डाग निघून जातील.

आम्ही आपल्यासाठी नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा. आपल्याला इस्त्रीवरील डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page