हे दुर्मिळ औषधी गुणधर्म असणारे फळ खाल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमितपणे महत्वपूर्ण फळांची माहिती आपल्याला देत असतो. आज आपण ज्या फळाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आपल्याला फोटोबघून कळले असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे वेगवेगळ्या भागात या फळाला काय म्हणतात हे सगळ्यांना कळेल.

चला तर आता आपण ह्या दुर्मिळ फळाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. ह्या फळाला मराठीमध्ये कवठ असे म्हणतात. तर हिंदीमध्ये कबीट असे म्हणतात. पूर्वी कवठाची झाडे नदीच्या काठी, दाट जंगलात पाहायला मिळायची मात्र आता ग्रामीण भाग सोडला तर हे झाड कुठेच दिसत नाही.

कवठ दिसायला बेल फळासारखी असतात; कवठाचा वरचा भाग खडबडीत असतो. पिकलेल्या कवठामध्ये तपकिरी रंगाचा आंबट गोड गर असतो; कवठ फळापासून चटणी, मुरंबा, अशा गोष्टी बनवता येतात. आता आपण कवठ फळाच्या औषधी गुणधर्माविषयी जाणून घेऊयात.

कवठ फळामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा केरोटीन, प्रोटीन, रायबोफ्लॅविन, लोह, कॅल्शिअम, फायबर आणि फॉस्फरस असे पोषक घटक असतात. कवठ फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने कवठाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते.

ज्यांना पित्ताचा त्रास नेहमी होतो त्यांनी कवठाचे सेवन अवश्य करावे कारण कवठ फळाचे सेवन केल्याने पित्ताचे शमन व्हायला मदत होते. तसेच उलटी मळमळ, तोंडाला चव नसल्यास आपण कवठ फळाचे सेवन करू शकता.

कवठ हे पचनशक्ती चांगले करणारे फळ असल्याने कवठाचे सेवन केल्याने मूत्रपिंड आणि यकृत यामध्ये असणारे विषारी घटक बाहेर पडायला मदत होते.

कवठामध्ये प्रोटीन घटक मोठ्या प्रमाणात असल्याने नियमित कवठाचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू मजबूत व्हायला मदत होते. कवठाचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते तसेच केस मजबूत आणि दाट होतात.

कवठामध्ये बीटा केरोटीन हा पोषक घटक असल्याने नियमितपणे कवठाचे सेवन करणाऱ्याची दृष्टी चांगली राहते. कवठाच्या झाडापासून मिळणारा डिंक देखील बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून वापरला जातो.

आपल्याला कवठापासून बनवलेली चटणी आवडते का? आपण ती कशी बनवता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपल्याला कवठ फळाचे औषधी गुणधर्म हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page