अत्यंत दुर्मिळ आणि सर्वात महाग गोल्डन ब्लड ग्रुप

आपल्या शरीरात ए, बी, एबी, ओ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रक्तगट असतात , परंतु या सर्वांशिवाय एक रक्तगट आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही आणि तो अत्यंत दुर्मिळ आहे, म्हणूनच त्याला गोल्डन ब्लड असे म्हणतात; विशेष म्हणजे या रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाशी जुळले जाऊ शकते.

हा रक्तगट फक्त त्या व्यक्तीच्या शरीरात आढळतो ज्याचा आरएच फॅक्टर शून्य Rh-null असतो. आज आपण ह्या अत्यंत दुर्मिळ आणि महाग रक्तगटाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आतापर्यंत जगात राहणाऱ्या केवळ ४५ लोकांमध्ये हा रक्तगट आढळून आला आहे. हा रक्तगट किती दुर्मिळ आहे याचा अंदाज आपण ह्या गोष्टीवरून लावू शकता. या रक्तगटाचे नाव Rh Null Blood Group असे आहे. Rh हे एक प्रकारचे प्रथिने असते.

जे लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असते. आपल्या शरीरात, हा आरएच एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक असतो. पण ज्यांच्या रक्तगट Rh Null असतो, त्यांचे शरीर आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते.

हा रक्तगट असणाऱ्यांना एनिमिया, अशक्तपणा हे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून असा रक्तगट असणाऱ्यांना आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते.

आम्हाला आशा आहे कि अत्यंत दुर्मिळ आणि सर्वात महाग गोल्डन ब्लड ग्रुप विषयी हि माहिती आवडली असेल. तरी सुद्धा आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती सगळ्यात आधी वाचण्यासाठी आमचे फेसबुक लाईक/ फॉलो करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page