आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. रात्री पुरेशी झोप न घेतल्याने, ताण तणाव, पुरेश्या प्रमाणात पोष्टिक आहार न घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळ्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच आज आपण डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे गायीचे दुध घ्या त्यानंतर डोळे झाकून आपल्या भुवयांच्या खालच्या भागावर ते लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर धुऊन टाका. काही दिवस हा उपाय केल्याने काळी वर्तुळे नाहीशी होतील.
कापसावर गुलाबजल घेऊन ते आपल्या डोळ्यांच्या खालच्या भागावर लावल्याने काळी वर्तुळे नाहीशी होतात. काही दिवस दही आणि बेसनाची पेस्ट डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर लावल्याने काळी वर्तुळे नाहीसे होतात.
संत्र्याच्या साल वाळवून पावडर तयार करा. ह्या पावडरमध्ये थोडेसे गायीचे दुध मिसळून ते आपल्या डोळ्यांच्या खालच्या भागावर लावा. काही दिवस हा उपाय केल्याने काळी वर्तुळे नाहीसे होतील. ( संत्र्याच्या सालीचा वापर करताना डोळे व्यवस्थित झाका. आणि डोळ्यांच्या खालच्याच भागावर लावा. संत्र्याच्या सालीची पावडर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या)
आपल्याला डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यावर करा हे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.