डोळ्यांना बिलणी रांजणवाडी आल्यास करा हे घरगुती उपाय

आपल्या डोळ्यांच्या पापणीला आलेल्या फोडाला, गाठीला रांजणवाडी असे म्हणतात. यालाच महाराष्ट्रातील काही भागात बिलणी असे देखील म्हणतात. बिलणी यायच्या आधी अचानकपणे डोळ्याना वेदना सुरू होतात, डोळ्यांना सारखी सारखी खाज यायला लागते, पापणीवर सूज येते. डोळे लालसर होतात, डोळ्यांना काहीतरी टोचतय असे वाटायला लागत.

डोळ्यांमधून पाणी येत हि लक्षणे आपल्याला आढळून आल्यानंतर पापणीवर फोड, पुरळ आल्यासारखे जाणवल्यास यालाच रांजणवाडी झाली असे म्हणतात. डोळ्यांना रांजणवाडी येण्याची कोणकोणती कारणे असतात हे आपण समजून घेऊयात

जर आपल्याला सारखा डोळ्यांना हात लावायची किंवा डोळे चोळण्याची सवय असेल तर त्यामुळे आपल्याला रांजणवाडी येऊ शकते. सध्याच्या प्रदूषित वातावरणामुळे बऱ्याचदा आपल्या डोळ्यांमध्ये धुळीचे लहान लहान कण जात असतात. हे कण डोळ्यात गेल्याने डोळ्यांना खाज येऊन डोळ्यामधून पाणी यायला लागत.

डोळ्यांमध्ये गेलेली घाण, धुळीचे कण वेळीच न काढल्यास डोळ्याच्या पापण्यावर गाठी येऊ शकतात. आपल्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्स मधील बदलामुळे सुद्धा रांजणवाडी येऊ शकते या बरोबरच आपण दिवसभरात पुरेसे पाणीपित नसाल.

तसेच आपल्या आहारात तिखट आणि तेलकट पदार्थाचा समावेश जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे आपल्याला रांजणवाडी येऊ शकते. डोळ्यांना रांजणवाडी आल्यावर ती घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती करता येऊ शकतात हे जाणून घेऊया.

रांजणवाडी घालवण्यासाठी एका वाटीत थोडेसे कोमट पाणी घ्या त्यामध्ये सुती कपडा बुडवून डोळे बंद करून तो कपडा आपल्या पापणीवर ज्या ठिकाणी आपल्याला रांजणवाडी आली आहे त्या ठिकाणी हळुवारपणे शेकवा. हा उपाय दिवसातून 3 ते 4 वेळा केल्याने रांजणवाडीमुळे आपल्या डोळ्याला आलेली सूज कमी होईल व होणाऱ्या वेदना कमी होतील.

डोळ्यांना आलेली रांजणवाडी घालवण्यासाठी आपल्या डोळ्याच्या पापणीवर ज्या ठिकाणी फोड, पुरळ आलेला आहे त्या ठिकाणी थोडासा कोरफड गर लावा हा उपाय दिवसातून 4 ते 5 वेळा केल्यास रांजणवाडीचे पुरळ निघून जाईल आणि आपल्याला लवकर आराम मिळेल.

डोळे हा अवयव शरीरातील सगळ्यात नाजूक असतो. त्यामुळे आपल्याला डोळ्यांना रांजणवाडी येऊ नये या करता आपण पुढे दिलेल्या गोष्टींचे पालन व्यवस्थितपणे करा.

दररोज पुरेशी झोप घ्यायची सवय स्वताला लावा. दररोज आपल्या शरीराला चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी पुरेश्या आरामाची देखील गरज असते आपण दररोज कमीत कमी 6/ 7 तास झोप घेऊ शकता. आपल्या चेहऱ्यावर आपण जी प्रसाधने वापरतो त्यांचा वापर करताना ती डोळ्यांच्या जवळ लावू नका.

निकृष्ट दर्जाच्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर केल्याने देखील डोळ्यांना खाज येऊ शकते. हाताने डोळे सारखे सारखे चोळू नका. दररोज दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

बाहेर जाताना गॉगलचा वापर करा जेणेकरून धुळीचे लहान कण आपल्या डोळ्यात जाणार नाही. आपल्याला डोळ्यांना रांजणवाडी आल्यावर ती घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती करता येऊ शकतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page