डोळ्यांखाली सुरकुत्या येणे घरगुती उपाय

केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर केल्याने, ताणतणाव आणि चिंता यामुळे वयाच्या तिशीनंतर आपल्या चेहऱ्यावर विशेषकरून डोळ्याखाली आणि मानेवर सुरकुत्या दिसू लागतात.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियामध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत डोळ्यांखाली येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय ज्याच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येईल.

चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी आपण जायफळ आणि मधाचा उपयोग करू शकता यासाठी एक चमचा जायफळ पावडर घ्या त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्या. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सुरकुत्या आल्या आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने लावा.

10 ते 15 मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय केल्यानंतर उन्हात जाऊ नका तसेच चेहऱ्यावर दुसरे कोणतेही क्रीम लावू नका. जायफळमध्ये असलेल्या एन्टी बॅक्टीरियल, एन्टी फंगल आणि एन्टी-मायक्रोबियल गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी आपण नारळाच्या दुधाचा उपयोग करू शकता. यासाठी एक ओल्या नारळाचे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून गाळणीच्या सहाय्याने नारळाचे दुध गाळून घ्या. त्यानंतर हे नारळाचे दूध कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहूद्या आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आठवड्यातून तीनवेळा करा.

चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी एक चमचा पपईचा गर काढून आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सुरकुत्या आल्या आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने स्क्रब करा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केला तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी चार ते पाच बदाम रात्री दूधात भिजत ठेवा. सकाळी या बदामांची साले काढून दुधासोबतच मिक्सरमध्ये वाटून घ्या.

हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सुरकुत्या आल्या आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने लावा. साधारणपणे 20 मिनिटे राहूद्या नंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. बदामामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळेल आणि आपली त्वचा पुन्हा उजळ दिसू लागेल.

चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ द्यायच्या नसल्यास आपण हि काळजी घेऊ शकता रात्री झोपण्याआधी आपल्या हातावर किंचित बदाम तेल घेऊन हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर चोळा.

बदाम तेलामध्ये विटामिन ई असते ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला पोषण मिळते. आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो. रात्री झोपताना पंख्याखाली झोपू नका. पंख्याची हवा सरळ चेहऱ्यावर पडल्यास चेहऱ्याला सूज येते.

त्वचेवरील ओलावा वाऱ्यामुळे शोषून घेतला जातो आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. म्हणूनच रात्री झोपताना पंख्याखाली झोपू नका. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. पाण्यामुळे आपल्या त्वचेतील आद्रता कमी होणार नाही. रात्रीचे अती जागरण करणे टाळा तसेच अती झोप घेणे देखील टाळा.

आपल्याला डोळ्यांखाली सुरकुत्या येणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page