डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या दैनंदिन कामामुळे, ताणतणावामुळे, झोप न झाल्याने, उष्णतेमुळे अस्वस्थ वाटून डोके दुखायला लागते. अशा वेळी वेदना लवकर दूर करण्यासाठी आपण कोणतीही वेदनाशामक गोळ्या, औषध घेतो. त्यांचे सेवन केल्याने आपल्याला वेदनांपासून आराम मिळतो, परंतु वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतो.

म्हणूनच डोकेदुखीच्या वेदनांवर मात करण्यासाठी आपल्याकडे घरगुती उपायांचा पर्याय आहे. ते आरोग्यास हानी न पोहोचवता केवळ वेदनांपासून आराम देण्याचे काम करतात. चला तर मग जाणून घेऊया डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय वापरावेत.

जर आपल्याला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा आपण तुळशीच्या पानांच्या मदतीने आराम मिळवू शकता. जेव्हा ही डोके दुखत असेल तेव्हा तुळशीची काही पाने एक कप पाण्यात टाकून चहाप्रमाणे उकळा. त्यात मध घालून सेवन करा. तुम्हाला काही वेळातच फरक जाणवेल.

आल्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. पण आपल्याला माहित आहे का, आल्याच्या वापर करून सुद्धा आपण  डोकेदुखीपासून मुक्ती मिळवू शकता. आल्यामध्ये असे गुणधर्म असतात ज्याच्या मदतीने आपल्याला मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

जेव्हा कधी आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर आपण आल्याचा कोरा चहा पिऊ शकता. याशिवाय तेलात आल्याचा रस टाकून हलक्या हाताने डोक्याला मसाज करा. असे केल्याने वेदना कमी व्हायला मदत होते, हा उपाय आपण मान आणि कंबरदुखी साठी देखील करू शकता.

डोकेदुखी कमी करण्यासाठी लवंग ही फायदेशीर आहे. आपण तव्यावर काही लवंगा गरम करा आणि या गरम लवंगा रुमालात गुंडाळून त्या रुमालाचा काही वेळ वास घेत राहा; असे केल्याने डोकेदुखीत आराम मिळेल.

अक्युप्रेशरच्या मदतीनेही डोकेदुखी दूर करता येते. तुमचे दोन्ही तळवे समोर घ्या आणि एका हाताने दुसऱ्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यातील जागेवर हलक्या हाताने मसाज करा. असे ५ मिनिटे करा. तुम्हाला वेदनांपासून आराम वाटेल.

अनेक वेळा शरीरात पाणी कमी झाल्यामुळे ही डोकेदुखीचा त्रास होतो . अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या. आपल्याला डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका.

माहिती आवडली असेल तर शेयर करा; या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page