डोकेदुखी प्रकार आणि डोकेदुखी वेदना कमी होण्यासाठी घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आपल्या आरोग्यासंदर्भातील वेगवेगळ्या समस्यांविषयी महत्वपूर्ण आणि उपयोगी माहिती नियमितपणे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत.

हि माहिती आपल्याला नियमितपणे मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करून ठेवा. आज आपण डोकेदुखी ह्या आजाराच्या प्रकारांविषयी आणि डोके दुखत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकता हे जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचे डोके वेगवगेळ्या कारणांनी दुखायला लागत मग अशा वेळी आपण पटकन मेडिकल मध्ये जातो आणि एखादी वेदनाशामक गोळी घेतो.

बऱ्याचदा अश्या वेदनाशामक गोळ्या घेतल्याने वेदना थांबतात. मात्र नियमितपणे वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

डोकेदुखी हा आजार आपल्याला वाटतो तितका सामान्य आजार नाहीये. वेदनाशामक गोळ्या ह्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आणि ठराविक प्रमाणातच घेणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. तेव्हा इथून पुढे डोके दुखत असल्यावर स्वता मेडिकलमध्ये जावून गोळ्या घेताना हि गोष्ट लक्षात असुद्या.

आता आपण डोकेदुखीच्या काही महत्वाच्या प्रकारांची माहिती घेऊयात.  बऱ्याचदा अगदी अचानकपणे डोक्याच्या एका बाजूला वेदना व्हायला सुरुवात होते. यालाच अर्धशिशी, मायग्रेन असे म्हणतात ह्या वेदना काही रुग्णांच्या बाबतीत काही तास होत राहतात तर काही काही रुग्णांच्या बाबतीत अनेक दिवस सुद्धा होऊ शकतात.

अर्धशिशी, मायग्रेन  म्हणजेच अर्धे डोके दुखत असल्यास आपल्या नाकामध्ये शुद्ध तुपाचे दोन थेंब टाका असे केल्याने वेदना कमी होऊन आपल्याला आराम मिळू शकतो.

वातावरणातील बदल, धूळ, धूर, प्रदुषण, आणि तीव्र वासाने होणाऱ्या डोकेदुखीला सायनस असे म्हणतात. सायनसचा त्रास होत असल्यास नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात.

ह्या डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी आपण दिवसातून दोनवेळा 5 मिनिट गरम पाण्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून वाफ घेऊ शकता. तसेच वाफ घेताना दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास घ्या. सायनसचा त्रास होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्या. सायनसचा त्रास होत असल्यास तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थांचे सेवन करू नका.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अति विचार करायची सवय असते. त्यांना तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो. अत्याधिक चिंता केल्याने होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी नियमित पुरेशी झोप घ्या, सकाळी कोवळ्या उन्हात मन शांत होण्यासाठी योगा, ध्यानधारणा करा, अत्याधिक विचार करणे टाळा, भरपूर पाणी प्या.

आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. म्हणून डोकेदुखत असल्यावर दिवसातून दोन वेळा कपभर आल्याचा कोरा चहा प्या. असे केल्याने वेदना कमी होऊन आपल्याला बरे वाटेल. आपल्याला डोके दुखत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page