डोकेदुखी पासून तत्काळ आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

आजूबाजूला मोठ्याने गोंगाट होत असल्यास, आवाजामुळे, जास्त वेळ कॉमप्यूटर वर काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन, वेळेवर जेवण न केल्याने, पुरेसे पाणी न प्यायल्याने, ताण तणाव यामुळे डोके दुखत असल्यावर आपण खाली दिलेल्या घरगुती उपायांपैकी एखादा उपाय करू शकता. चला तर वेळ न दवडता जाणून घेऊयात डोकेदुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

पोटात गॅस झाल्यामुळे डोके दुखत असल्यावर कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून प्या. अपचन झाल्यास, मळमळ आणि उलटी बरोबरच डोकेदुखी सुद्धा होते अशा वेळी देखील आपण हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने डोकेदुखी तत्काळ थांबेल. सफरचंदाला मीठ लावून खाल्याने डोकेदुखी थांबायला मदत होते.

डोकेदुखी पासून तत्काळ आराम मिळण्यासाठी एका वाटीत 2-3 चमचे तुळशीच्या पानांचा रस घ्या त्यामध्ये थोडासा आल्याचा रस मिसळून प्या. थोडासा रस आपल्या कपाळावर लावा. असे केल्याने डोकेदुखीमध्ये खूप लवकर आराम मिळतो. कोऱ्या चहामध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने देखील डोकेदुखी कमी होते.

ऑफिसमध्ये असताना डोकेदुखी झाल्यास कामामधून थोडावेळ ब्रेक घ्या. आपले डोळे उघडझाप करा. थोडे पाणी प्या. ऑफिसमध्ये कॉफी किंवा चहा असेल तर तो प्या. आपल्याला बरे वाटेल.

ताण तणावामुळे डोके दुखत असल्यास ताण तणाव कमी होण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात चालायला जा. काही वेळ ध्यानधारणा करा. आपल्या आवडीचे संगीत ऐका.

कपाळावर लवंग तेल लावल्याने देखील डोकेदुखी थांबायला मदत मिळते. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page