अखंड हरिनामाच्या गजरात रंगणार ”दिवे घाट”

पुण्यातील दिवे घाटात, विठु उभा आहे थाटात. दरवर्षी आषाढी, कार्तिकी वारीचे मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे दिवे घाटाचं. ”ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम” या गजरात दिवे घाटाचा संपूर्ण परिसर उजळून निघतो.

वारकऱ्यांची वारी विठ्ठलाच्या ओढीने पुण्यातील दोन दिवसांची वस्ती संपवून पुण्याबाहेर निघते. यावेळी संपूर्ण दिवे घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो आणि या सौंदर्यात टाळ मृदूंगाच्या गजरात वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते. वारकऱ्यांच्या विठ्ठलभक्तीत सामील होणारा असा दिवेघाट कायम स्मरणात राहतो.

पुण्यापासून सासवड रोडला दिवे घाट लागतो. घाट तसा मोठा, पण सौंदर्याने फुललेला. याच दिवेघाटात आज मुख्य आकर्षण बनली आहे, ती म्हणजे विठ्ठल मूर्ती. घाटात जाताच विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे.

या मूर्तीची उंची ६० फूट आहे. विजय कोल्हापूरकर या हॉटेल व्यवसायिकांनी ही मूर्ती उभारली आहे. त्यामुळे या घाटाचे महत्व आणखीन वाढले आहे.

पाऊस पडून गेल्यानंतर फुलणारा निसर्ग मनात भरून जातो. त्यामुळे पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येथे अनेक पर्यटकांची गर्दी होते. हा घाट जैवविविधतेने नटलेला आहे.

घाटात वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुले पाहायला मिळतात. त्यामुळे या घाटात मुख्यतः अभ्यासकांची गर्दी झालेली दिसते. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या घाटात धुके पसरलेली दिसते.

या घाटात मस्तानी तलाव पाहायला मिळतो. तसेच घाट पार करून गेल्यानंतर सासवडचा संपूर्ण ऐतिहासिक ठेवा पाहायला मिळतो.

दिवे घाटाच्या जवळील पर्यटन स्थळे म्हणजे जाधवगड किल्ला, नारायणपूर, पुरंदर किल्ला, मल्हारगड किल्ला, बालाजी मंदिर ही ठिकाणे पाहू शकता. नैसर्गिक सौंदर्यासोबत भक्तीची ओढ दाखवणारा दिवेघाट एकदा तरी पाहावा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page