दिवसभरात पाणी पिण्याच्या या 5 महत्वाच्या वेळा पाळा अन्न पचन व्यवस्थित होईल वजन कमी होईल, एसिडीटी, बद्द्कोष्टतेचा त्रास दूर होईल

निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी, दिवसभरात केव्हा आणि किती पाणी प्यावे हे आपल्याला माहित असले पाहिजे. पाणी आपले शरीर हायड्रेटेड आणि निरोगी ठेवते. निरोगी आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे, कारण मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीला पाण्याची आवश्यकता असते.

शरीरातील पचन, हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या क्रियाकलापांसाठी पाणी महत्वाचे आहे. पण दिवसभरात कधी आणि किती पाणी प्यायला हवं हे आपण जाणून घ्यायला हवं.

आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी जास्त पाणी पितात, परंतु असे केल्याने त्यांचे वजन कमी होत नाही. याचे कारण असे की, आपण केव्हा आणि किती पाणी प्यावे हेच आपल्याला माहीत नसत; त्यामुळे आपण आपले वजन नियंत्रित करू शकत नाही.

पुरुषांनी दिवसभरात 10 ते 12 ग्लास आणि महिलांनी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे, मात्र गर्भवती स्त्रियांनी जास्त पाणी प्यायले पाहिजे. विविध संशोधनांनुसार, चांगल्या आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी आपण केव्हा आणि किती पाणी प्यावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्यायाम किंवा जॉगिंगला जाताना तुम्ही स्वतःला पूर्णपणे हायड्रेट ठेवले पाहिजे, तरच तुम्ही चांगला व्यायाम करू शकाल. जर आपले शरीर डीहायड्रेटेड असेल आणि तश्या अवस्थेत आपण व्यायाम अथवा जॉगिंग केल्यास आपल्याला चक्कर येऊ शकते.

त्यामुळेच व्यायाम सुरू करण्याच्या कमीत कमी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्या आणि व्यायाम पूर्ण झाल्यावर किंवा जॉगिंगवरून परतल्यानंतरही एक ग्लास पाणी पिणे ही महत्वाचे आहे.

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील मलनिस्सारण क्रिया योग्य प्रकारे होते. अर्थात पोट व्यवस्थित साफ होते.

आपल्या शरीराचे वजन नियंत्रण करण्यात पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने पोट थोडे भरल्यासारखे वाटते, त्यामुळे तुम्ही जास्त अन्न खाऊ शकत नाही. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने कमी खाण्यास मदत होते.

जेवणासोबत थोडेसे पाणी प्यायल्याने पचनास मदत होते. जास्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करताना पाणी पिणे आवश्यक असते. कारण आपल्या आहारात असेलेले फायबर घटक पचनमार्गातून फिरतात आणि पाणी शोषून घेत असतात, जर आपण हिरव्या भाज्यांचे  आहारात सेवन करत असाल तर त्यासोबत काही घोट पाणी ही प्या.

झोपण्यापूर्वी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे, परंतु यावेळी एक ग्लास पाणी पिणे आवश्यक नाही, कारण जास्त पाणी प्यायल्याने रात्रीच्या वेळी सतत लघवीला जाण्याची शक्यता असते आणि त्याने झोप मोडते, त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम ही होऊ शकतो. म्हणून झोपण्याच्या आधी तुम्ही अर्धा ग्लास किंवा थोडे कमी पाणी प्या.

डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी, तसेच मायग्रेनचा झटका येऊ शकतो. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूरोसायन्सच्या मते, जुलै 2020 मध्ये प्रौढ महिलांमध्ये केलेल्या चाचणीत असे दिसून आले आहे की मायग्रेन असलेल्या लोकांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढवल्याने मायग्रेनची तीव्रता आणि वारंवारता कमी होण्यास मदत झाली आहे .

आपल्याला हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page