डायबेटीस आजार होण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात?

आपल्या देशात डायबेटीस हा आजार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आपण बऱ्याचदा ऐकत असतो. डायबेटीस आजार होण्याआधी आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला माहित असल्यास आपण वेळीच त्यावर उपचार घेऊ शकता.

कोणताही आजार प्राथमिक अवस्थेत असताना त्यावर उपचार केले तर त्या आजारातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच हि महत्वपूर्ण माहिती वाचून झाल्यावर जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका.

सर्वात पहिले आपण डायबेटीस म्हणजे काय हे समजून घेऊयात. आपल्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोन बनवण्याचे कार्य करत असते. जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन ह्या हार्मोनची निर्मिती कमी प्रमाणात होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यालाच डायबेटीस, मधुमेह असे म्हणतात. इन्सुलिन हे ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते.

डायबेटीसचे 2 प्रकार असतात. टाईप 1 डायबेटीसमध्ये शरीरात अत्यंत कमी प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होत असते. म्हणूनच टाईप 1 डायबेटीस रुग्णांना बाहेरून इन्सुलिन दिले जाते.

टाईप 2 डायबेटीस हा वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास, जास्त वेळ एकाच जागी बसून काम करणाऱ्यांना, अयोग्य आहार घेणाऱ्याना होतो. या प्रकारचा डायबेटीस आहारात योग्य बदल आणि व्यायाम करून आपण नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

आता आपण डायबेटीस होण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसून येतात हे जाणून घेणार आहोत. डायबेटीस होण्याआधी अचानक वजन कमी व्हायला लागत, अगदी अशक्तपणा येतो, चक्कर येते, हाता पायांना सतत टोचल्यासारखे वाटते, सारखी सारखी तहान लागते, लांबच्या गोष्टी धूसर दिसू लागतात.

हाता पायांना मुंग्या येतात, हात पाय बधीर होतात, शरीरावर झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, सारख सारख लघवीला जाव लागत, थोड काम केल तरी थकवा येतो; डायबेटीस होण्याच्या आधी हि लक्षणे दिसून येतात.

आपल्याला डायबेटीस आजार होण्याआधी शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page