आकाशाला भिडणारा सुळका असणारा धोडप किल्ला

नाशिक जिल्यात किल्ल्यांची मांदियाळी उभी आहे. धोडप हा बलदंड किल्ला आपल्या सर्वांना भुरळ घालतो. नाशिकच्या अगदी मधोमध असलेला हा किल्ला देखण्या पाषाण शिल्पांनी सजलेला आहे. या गडावरील पाषाण शिल्पे म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

हा किल्ला अजिंठा-सातमाळा या डोंगर रांगेच्या कुशीत वसलेला आहे. या किल्ल्याची उंची नजरेत सामावणारा नाही, इतका उंच हा किल्ला आहे. हा किल्ला पाहताना अनेक पक्षी, पाने, फुले यांचे दर्शन होते. ही जैवविविधता पाहण्यासारखी आहे.

या गडावर असलेला उंच बुरुज आकाशात झेपावत आहे, असे वाटते. येथून सूर्यास्त पाहण्याची मज्जा काही औरच आहे. या गडावर चक्क ३५ मीटर लांब आणि एक ते दोन मीटर उंचीचा बोगदा तयार झाला आहे, इतकेच नाही तर या बोगद्याच्या तोंडाजवळ गुहा आणि बाजूला पाण्याचे टाक हा अद्भुत चमत्कार पाहून आश्चर्य वाटते.

या किल्यावर शिलालेख पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या डाव्या भिंतीवर फारशी लिपीतील एक शिलालेख आढळून आला आहे.

या किल्यावर सोनारी माची, मंदिरे, पायऱ्या, महादरवाजा, विहिरी या वास्तू पाहायला मिळतात. या किल्ल्याचे आणखीन एक खास वैशिट्य असे की या किल्ल्यावरून चक्क २५ किल्ले दिसतात. 

तसेच येथून सातमाळा, चांदवड, इंद्राई, सप्तशृंगी, रावळ्याजवळ्या दिसतात. या किल्याचे महत्व राघोबा दादा आणि पेशवे यांच्याकाळी होते. हा किल्ला १८१८ मध्ये मराठ्यांकडून इंग्रजानी जिंकून घेतला.

नाशिकवरून सरळ वडाळीभोई येथून धोडांबे या गावात जावे. घोंडबे येथून हत्तीपाडा येथे जाऊन पोहचाल. हे गाव म्हणजे धोडप गडाचा पायथा. येथून गडावर जाता येते. गडावर विहिरी आणि तलाव असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

तसेच गडावर गुहा असल्याने राहण्याची उत्तम सोय आहे. पायथ्यापासून हा किल्ला चढण्यासाठी बराच वेळ लागतो. हा किल्ला चढण्यास पायथ्यापासून अडीच ते तीन तास लागतात. तसेच किल्ल्याचा सुळका चढताना सावधानता बाळगावी.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page