गव्हामध्ये किडे होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय

आपल्या घरामध्ये पोळी/ चपाती बनवण्यासाठी आपण गहू ह्या धान्याचा वापर करत असतो. आपल्यापैकी बरेच जण आपल्या कुटुंबाला संपूर्ण वर्षभर पुरेल इतके धान्य एकदमच घेऊन आपली जबाबदारी पूर्ण करतात.

आता हे वर्षभर पुरेल इतके धान्य कशा प्रकारे साठवायचं हे येऊन पडत घरातल्या गृहिणीवर; वर्षभर धान्य साठवायचं म्हटल तर ते व्यवस्थित साठवल पाहिजे नाहीतर त्यात किडे, अळ्या, सोंडे होऊ शकतात. म्हणूनच आज आपण गव्हामध्ये किडे होऊ नये यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात धान्यात किडे होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात? जर आपण धान्य साठवणूक करण्यासाठी जुन्या गोणी, जुनी पोती अशा गोष्टी वापरत असाल तर त्यामध्ये किडे अळ्याची अंडी असण्याचा धोका असतो.

यामुळे देखील धान्यात किडे होऊ शकतात याबरोबरच धान्य साठवण्याआधी व्यवस्थित धान्य ओलसर असेल तर, धान्य साठवण्याची जागा हवा खेळती नसेल तर धान्यात किडे होऊ शकतात.

धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी म्हणजेच गोणी, पोती स्टीलची टाकी, पिंप दोन ते चार दिवस उन्हात चांगले सुकवून मग त्यात धान्य साठवणे योग्य राहील. धान्य देखील चांगले पाच ते सहा दिवस कडक उन्हात वाळवून मगच साठवा.

धान्य साठवताना त्यामध्ये कडूलिंबाची सावलीत सुकवलेली पाने घाला. असे केल्याने धान्यात किडे होत नाही. तसेच याशिवाय अजून हि काही उपाय आपण करू शकता.

जसे कि सुती कापडात खडे मीठ बांधून ते देखील धान्यात ठेवू शकता; कोळसा ठेवू शकता. कोळसा धान्यामुळे, वातावरणामुळे निर्माण होणारी आद्रता शोषून घेतो. आणि आपल्या धान्याचे सरंक्षण होते.

आपल्याला गव्हामध्ये किडे होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच माहिती आपल्याला वाचायला हवी असेल तर ते देखील सांगा.

अजून कोणती माहिती आम्ही द्यावी हे सुद्धा आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर फेसबुक पेज लाईक/ फॉलो करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page