आपल्या शरीरात जवळपास 70 टक्के पाणी असते. पाणी ही आपल्या शरीराची सर्वात मोठी गरज असते. उन्हाळ्यात अत्याधिक घाम आल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होण्याचा धोका असतो.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेला मराठीत निर्जलीकरण असे म्हणतात. लहान मुल आणि वयोवृद्धांना डिहायड्रेशन होण्याचा सर्वाधिक धोका असतो. डिहायड्रेशन झाल्यावर योग्य वेळी त्यावर उपाय केले नाही तर डिहायड्रेशनमुळे मृ’त्यू ही होऊ शकतो.
सर्वप्रथम आपण डिहायड्रेशनची लक्षणे जाणून घेऊयात. अचानक झपाट्याने वजन कमी होणे, तोंड, ओठ कोरडे पडणे, सारखे डोके दुखणे, लघवीला न येणे, लघवी कमी होणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, थकवा आल्यासारखे वाटणे.
कोणतेही काम करायला उत्साह न राहणे, चीड चीड होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, ह्रदयाचे ठोके जलद होणे, रक्तदाब कमी होणे, त्वचा कोरडी पडून अंगाला खाज सुटणे डिहायड्रेशनचा त्रास होत असल्यावर हि काही लक्षणे दिसून येतात.
डिहायड्रेशनचा त्रास झाल्यावर सतत पाणी प्या. सर्वसाधारपणे दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यायलाच हव. डिहायड्रेशनचा उपचार करण्यासाठी आपण ओआरएस चे सेवन करू शकता. ओआरएसमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, साखर, मीठ असे घटक असतात ज्यामुळे त्वरित उर्जा मिळून आपल्याला आराम मिळू शकतो.
डिहायड्रेशनचा उपचार करण्यासाठी आपण नारळ पाणी पिवू शकता, नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स सोडियम, पोटॅशियम हे पोषक घटक असतात, नारळाचे पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनमुळे आपल्याला आलेला थकवा दूर होऊन बरे वाटेल. नारळ पाणी हे आपल्या त्वचा, केस आणि शरीरासाठी खूप चांगले असते.
डिहायड्रेशन पासून आराम मिळण्यासाठी आपण ताक पिवू शकता. डिहायड्रेशन पासून आराम मिळण्यासाठी आपण उसाचा रस पिवू शकता. उसाचा रसामध्ये सूक्रोज, ग्लूकोज असते. उसाचा रस प्यायल्याने त्वरित ताजेतवाने वाटते.
डिहायड्रेशन होऊ नये यासाठी जास्त वेळ उन्हात फिरणे टाळा. उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्री घेऊन जा, उन्हाळ्यात नियमित पुरेसे पाणी प्या, संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद, कलिंगड, खरबूज अशा फळांचे ज्यूस प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहील.
आपल्याला डिहायड्रेशन लक्षणे आणि 5 घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.