शत्रूची दिशाभूल करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने बांधलेला – दौलताबादचा देवगिरी किल्ला

या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व आहे ते या किल्ल्याने अनेक वंशज पाहिल यामुळे यादव ते मोगल अशी अनेक घराणी या किल्याच्या आश्रयास होती. या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आसे की, या गडाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की जरी शत्रूने या किल्ल्यावर हमला केला तरीही शत्रूला किल्ल्याचे रस्ते सहज प्रवेश करू देत नव्हते. शत्रूची दिशाभूल होण्यासाठी या गडाची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण केली होती.

महाराष्ट्रातील औरंगाबादपासून 13 किलोमीटरवर हा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम  दौलताबादचा राजा भिल्लम राज याने केली. 1187 झाली या किल्ल्याचे नवीन नाव देवगिरी अस करण्यात आले. अवघ्या दोन हजार सैनिकांनी पन्नास हजार सैनिकांचा पराभव करण्याचा इतिहास या किल्ल्यांनी रचला. म्हणून या किल्ल्याला अतिशय महत्त्व आहे.

किल्याच्या भिंतींची रचना बळकट असून किल्ल्यावर अनेक वास्तू पाहायला मिळतात. या किल्ल्यावर जाताना तीस मीटर उंचीचा चांदमिनार दिसतो. जो किल्ल्यावरून नजर ठेवण्यासाठी बांधलेला आहे.

12 किलोमीटर लांब मारा करु शकणारी मेंढा तोफ या किल्ल्यावर पहायला मिळते. सुंदर महाल, सज्जा, धान्य आणि दारुगोळा ठेवाण्यासाठी असलेला काळाकोट, सुंदर हेमाडपंथी मंदिर, हत्ती हौद अशा अनेक वास्तू पहायला मिळतात.

किल्ल्यावरील हत्ती हौदाच्या समोरील बाजूस दरवाजातून आत जाताच भव्य सभामंडप दिसते. इ.स. 1947 ते 1948 मध्ये या किल्ल्यावर स्थानिक लोकांनी भरतामतेची मूर्ती स्थापन केलेली दिसते.

भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्यातील एक महत्वपूर्ण किल्ला आहे. किल्ल्याला संपूर्ण बाजुंनी तटबंदीने वेढले आहे. हा किल्ला यादवकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. हा किल्ला भारत सरकारने 28 नोव्हेंबर 1951ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Comment

You cannot copy content of this page