थंडीच्या दिवसात दात आणि हिरड्यामध्ये दुखण्याची समस्या येत असते. जर तुम्हाला ही दातांच्या दुखण्याची समस्या असेल तर हे काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. चला तर जाणुन घेउयात.
कधी कधी दातांच्या दरम्यान अन्नाचे कण अडकतात त्यामुळे दाढ दुखत असते. यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा, त्या पाण्याने गुळण्या करा.
खारट पाणी संसर्गापासून वाचवते आणि दातांच्या मध्ये अडकलेले अन्न काढून टाकण्यास मदत करते. यामुळे सूज देखील थांबते आणि हिरड्यांमध्ये असणारे बॅक्टेरिया निघून जाऊन दाढ दुखी पासून आराम मिळेल.
दाढ दुखत असल्यावर लसणाच्या पाकळ्या सोलून पेस्ट बनवा ही पेस्ट हिरड्या किंवा दातांवर लावा. असे केल्याने दाढ दुखी पासून तुम्हाला आराम मिळेल. लसूण दाढेच्या दुखण्यावर वेदनाशामक म्हणून कार्य करते.
दाढ दुखत असल्यावर लवंग तोंडात धरा. तुम्हाला दाढेच्या दुखण्यापासून आराम मिळेल. घरी लवंग तेल उपलब्ध असल्यास लवंग तेलाचे २ थेंब कापसाच्या बोळ्याने दुखणार्यार दातावर लावा. लवंग तेल सुद्धा दातदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दात दुखत असल्यास जिरे बारीक करून त्यात मीठ मिसळून दात घासल्यास दातदुखीमध्ये आराम मिळतो तसेच तोंडाला येणारा दुर्गंध ही जातो. याबरोबरच दाढ दुखत असल्यावर सुंठेचा तुकडा चघळा असे केल्याने दाढ दुखी पासून तुम्हाला आराम मिळेल. सुंठ उपलब्ध नसल्यास आल्याचा तुकडा चघळला तरी चालेल.
आपल्याला दातदुखी, दाढदुखी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.