दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी 5 प्रभावी उपाय

चांगल दिसण्यासाठी आपला चेहरा आणि केस चांगले असले पाहिजे; अस आपल्याला वाटत असत. आणि ते खर देखील आहे. चेहरा चांगला दिसण्यासाठी आपण वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने वापरतो, तसेच केस चांगले असावे यासाठी वेगवेगळे शाम्पू, तेल अशा गोष्टी वापरतो.

मात्र जेव्हा कधी आपल्यावर समोरच्या व्यक्तीसोबत बोलायची वेळ येते. तेव्हा आपल्याला पूर्ण आत्मविश्वासाने बोलण करायला जमत नाही. याच एक कारण आपले पिवळसर दात हे असू शकत.

दात पिवळसर असणे हि सामान्य गोष्ट आहे. मात्र यामुळे समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना बऱ्याच जणांचा आत्मविश्वास डगमगतो म्हणूनच आज आपण दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी 5 प्रभावी उपायांची माहिती घेणार आहोत. आपले दात चांगले दिसावे यासाठी आपण हे काही उपाय करू शकता.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी एका वाटीत दोन चमचे बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून नंतर ती पेस्ट आपल्या पिवळ्या दातांवर ब्रशच्या सहाय्याने लावा. ही पेस्ट सुमारे एक मिनिट दातांवर राहू द्या आणि नंतर धुवा.असे एक किंवा दोनदा केल्याने आपल्या दातांवरील पिवळेपणा कमी होईल.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे मीठ मिसळून त्या मिश्रणाने दात घासा. आपले दात परत पूर्वीसारखे होतील.

दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. कडुलिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक घटक असतात.

कडुलिंबामध्ये आपले दात पांढरे करण्यासाठी आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांची अथवा सालीची पावडर आपण दात साफ करण्यासाठी वापरू शकता.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुळशीच्या पानापासून बनवलेल्या पावडरचा वापर आपण करू शकता. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी पिकलेल्या केळ्याची साल आपल्या दातावर हलक्या हाताने घासा असे केल्याने आपल्या दातावर आलेला पिवळेपणा कमी होईल.

आपल्याला दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी 5 प्रभावी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page