दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय

आपले दात मोत्यासारखे चमकदार आणि पांढरे शुभ्र असावेत अस आपल्याला वाटत असत. दात पांढरे शुभ्र दात पिवळसर असल्यास त्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा कमी होते. म्हणूनच आज आपण दातांचा पिवळेपणा कमी करून दात पांढरे शुभ्र दिसण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

दातांवर असणारा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक सोपा उपाय जाणून घेऊयात यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये 1 चमचा  मीठ आणि थोडेसे पाणी मिसळून चांगली पेस्ट बनवा.

आपल्याला वेळ मिळेल तेव्हा ही  पेस्ट रोज 1 ते 2 मिनिटे आपल्या दातांवर चोळा. आणि दात घासायच्या ब्रशने दात घासा. या पेस्टचा वापर केल्याने आपल्या दातांचा पिवळेपणा कमी होईल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आपण स्ट्रॉबेरीज् कुस्करून बारीक करा. त्यानंतर तयार झालेली पेस्ट दातांवर हलक्या हाताने चोळून लावा. काही दिवस हा उपाय केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होईल.

दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी आपण संत्र्याच्या सालींचा वापर करु शकता. संत्र्यांच्या सालींमध्ये सायट्रीक असिड असते. त्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होतो. हा उपाय करण्यासाठी संत्र्याची साल सावलीत सुकवून घ्या.

त्यानंतर चांगली सुकलेली साल मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. ह्या पावडरने दिवसातून 2 वेळा दात घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण केळे खाल्यानंतर केळ्याची साल टाकून न देता, त्या सालीच्या आतील भाग आपल्या दातांवर चोळा. असे केल्याने दात पांढरे होण्यास मदत मिळेल.

दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी कडूलिंबाची हिरवी पाने सावलीत सुकवून त्याची सुकल्यानंतर मिक्सर मध्ये पावडर तयार करून घ्या. ह्या पावडरने दिवसातून 2 वेळा दात घासल्यास दात पांढरे शुभ्र होतात. तसेच दातदुखी, दाढदुखी असे आजार हि होत नाही. आपले दात आणि दाढा मजबूत होतात.

आपल्या दातांच्या आजुबाजूला साचलेल्या पिवळ्या थरास प्लाक असे म्हटल जात. हा प्लाक घालवण्यासाठी अननसामध्ये असलेले इन्झाईम्स उपयोगी असतात यामुळे दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत मिळते. यासाठी अननसाची लहान फोड घ्या आणि दातांवर चोळा. असे केल्याने दातांवर असणारा पिवळेपणा कमी होईल.

आपले दात पिवळे पडू नये यासाठी दिवसभर काही खाल्ल्या-प्यायल्यानंतर चुळ भरण्याची सवय स्वताला लावावी. दात पिवळे पडू नये यासाठी आपण काळे मनुके चघळू शकता काळ्या मनुक्यांमधून बाहेर पडणारे असिडीक गुणधर्म आपल्या दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात.

दातांवर असणारा पिवळेपणा कमी करण्यासाठी जेवण झाल्यानंतर पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने चुळा भरा. हि सवय लावल्याने दात शुभ्र होण्यास मदत मिळेल.

दररोज सकाळी उठ्ल्यानंतर जसे आपण ब्रश करतो त्याचप्रमाणे रात्री झोपायच्या अगोदर ब्रश करण्याची सवय स्वताला लावून घ्या. आपल्याला दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page