डास चावल्याने डेंग्यू, मलेरियासारखे अनेक आजार होऊ शकतात. डासांपासून दूर राहण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डासांपासून दूर राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या कॉइल वापरल्या असतील.
ह्या कॉइलमध्ये घातक रसायने असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते. विशेषता लहान मुले, वृद्ध माणसाना कॉइलच्या वासामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते, श्वास घ्यायला अडचण येऊ शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत.
डास, मच्छर पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय. घरात येणारे डास, मच्छर पळवून लावण्यासाठी आपण झेंडूच्या फुलाचा वापर करू शकता. झेंडूची फुले लावलेल्या ठिकाणी डास येत नाहीत. त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला आपण झेंडूची झाडे लावू शकता.
कडूलिंबाच्या पानांचा धूर संध्याकाळच्या वेळी केल्यास धुरामुळे डास, मच्छर, कीटक पळून जातात. कडूलिंबाचे तेल आपल्या हातापायांना लावून देखील आपण डास, मच्छराना आपल्या पासून दूर ठेवू शकता.
निलगिरीचे तेल डासांना दूर करण्यासाठी वापरले जाते. यासाठी आपण निलगिरीचे तेल आणि लिंबूरस समान प्रमाणात मिसळून आपल्या घराच्या खिडक्या आणि मच्छर येण्याच्या जागेवर स्प्रे करू शकता.
संत्र्याची सुकलेली साल जाळून धूर केल्याने देखील घरात मच्छर डास येत नाहीत. घरात डास, मच्छर येऊ नये यासाठी आपण घराच्या दार, खिडक्या दिवे लागणीच्या आधी बंद करू शकता.
खिडक्याना जाळी लावू शकता. तसेच मच्छर दाणीचा वापर करू शकता. आपल्याला डास, मच्छर पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे