डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रीम, सौंदर्यप्रसाधने चेहऱ्याला लावत असतो. मात्र जर आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर त्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो.

क्रीम लावून आपण तात्पुरते डार्क सर्कल घालवू शकता मात्र डार्क सर्कल कायमचे घालवण्यासाठी आपल्याला आहारात आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेच असत.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यावर आपण वयापेक्षा मोठे दिसू लागता म्हणूनच त्यावर वेळीच उपचार करणे गरजेच असत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार डार्क सर्कल दूर करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी रात्री झोपायच्या आधी कापसावर बदाम तेल घ्या नंतर डोळे बंद करून हलक्या हाताने डोळ्यांच्या खाली असणाऱ्या काळ्या वर्तुळांवर लावा. सकाळी चेहरा धुऊन टाका. हा उपाय 7  ते 8 दिवस केल्याने काळी वर्तुळे कमी होतील.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी आपण बटाट्याचा देखील वापर करू शकता. यासाठी बटाट्याच्या चकत्या बनवा आणि हाताने ह्या चकत्या डार्क सर्कलवर ठेवा.

अथवा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि कापसावर बटाट्याचा रस घेऊन तो डार्क सर्कल वर लावा. ह्या उपायाने देखील लवकर डार्क सर्कल नाहीशे होतील.

डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण संत्र्याची साल सावलीत सुकवून त्याची पावडर तयार करून दुधामध्ये अथवा गुलाबजलमध्ये मिसळून डार्क सर्कलवर लावू शकता. काही दिवस हा उपाय केल्याने डार्क सर्कल नाहीसे होतात.

डोळे हा नाजूक अवयव असल्याने डार्क सर्कलवर उपचार करताना डोळे बंद ठेवावेत. पुरेशी काळजी घेऊनच वरील उपाय करा. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ नये यासाठी आपण दररोज नियमित 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे.

पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. आपल्या आहारात कोणतेही एक फळ, हिरव्या पालेभाज्या, गाजर, मुळा, बीट, काकडी यांचा समावेश असला पाहिजे.

Leave a Comment

You cannot copy content of this page