डार्क सर्कल घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमित आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती देत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत; डोळ्यांखाली डार्क सर्कल आले तर कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात.

आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येणे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. कॉम्पुटरवर जास्त वेळ काम केल्याने, मानसिक आणि शारीरिक ताण असल्यास, पौष्टिक आहाराचा अभाव, झोप न लागण्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येत असतात.

डोळ्यांखाली डार्क सर्कल आल्यावर घाबरून जाऊ नका ह्या काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण डार्क सर्कल घालवू शकता. डार्क सर्कल घालवण्यासाठी  एका वाटीत 2 चमचे गायीचे दुध घ्या.

त्यानंतर थोडासा कापूस घेऊन तो त्या थंड दुधात बुडवून आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला ज्याठिकाणी काळेपणा आलाय तिथे हलक्या हाताने फिरवा. दिवसातून दोन वेळा हा उपाय 21 दिवस करा.

डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण बटाट्याचा रस देखील वापरू शकता यासाठी चमचाभर बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो आपल्या डोळ्यांच्या भोवती दिवसातून दोन वेळा फिरवा असे केल्याने काही दिवसातच डार्क सर्कल नाहीशे होतील. डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण काकडीच्या कापांचा देखील वापर करू शकता.

डार्क सर्कल येऊ नये यासाठी काही उपाय. रात्री पुरेशी झोप घ्या, कॉम्पुटरवर जास्त वेळ करावे लागत असल्यास अर्धा तासाने पाच मिनिटाचा ब्रेक घ्या.

पुरेशे पाणी प्या, मोबाईलचा अति वापर करू नका; जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. आपल्याला डार्क सर्कल घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page