डाळींब खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त फळ आहे. डाळींबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. उन्हाळ्यात पाणीदार फळांचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेट राहायला मदत मिळते.

डाळींबामध्ये एंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी,  व्हिटॅमिन के लोह, फायबर, पोटॅशियम असे पोषक घटक असतात. डाळिंब हे रक्तवर्धक असते. म्हणूनच अशक्तपणा आलेला रुग्णाला डाळिंब खायला दिले जाते.

डाळींबाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळींबाचे सेवन केल्याने आपले दात, हिरड्या मजबूत व्हायला मदत मिळते.

डाळिंब खाल्याने पचनशक्ती वाढते तसेच आतड्यांची जळजळ आणि अल्सर पासून आराम मिळतो.  मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, हृदयरोग यांसारख्या आजारांवर सुद्धा डाळिंब अतिशय गुणकारी असते.  रोज डाळिंब खाल्याने स्मरणशक्ती सुधारायला मदत मिळते.

डाळिंबाची साल सावलीत सुकवून त्याची पावडर गुलाबजल मध्ये मिसळून चेहऱ्यावर लावून मसाज केल्याने मृत त्वचा निघून जाऊन चेहरा चमकदार होतो.

डाळींबाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नियमित डाळिंब खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात; तसेच चेहऱ्यावर चमक येते.

आपल्याला पोटाची चरबी घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आपण आधीपासून आवळ्याचा ज्यूस पित असाल तर आपल्याला त्यामुळे कोणकोणते फायदे झाले हे हि कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page