दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास करा हे घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिंपल्स येणे ह्या समस्येला पुरुषांनाही सामोरे जाव लागत. चेहऱ्यावर पिंपल्स आले कि आपला चेहरा खराब दिसायला लागतो. काही दिवसांनी पिंपल्स गेल्यावर सुद्धा चेहऱ्यावर त्याच्या खुणा तश्याच राहतात.

दाढी केल्यानंतर बऱ्याचश्या पुरुषांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. दाढी केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर ते घालवण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

दाढी केल्यावर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत आणि त्वचा मऊ राहावी यासाठी आपण दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने आपल्या चेहऱ्याची होणारी जळजळ आणि आग हि कमी होईल.

दाढी केल्यावर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपण निवडलेले ब्लेड किंवा रेझर सुद्धा कारणीभूत असू शकते त्यामुळे ते बदलून बघा. तसेच आपण जर दाढी करण्यासाठी साबण, आफ्टरशेव्ह लोशन अशा गोष्टी वापरत असाल ते जर आपल्या त्वचेला सुट होत नसल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे एक एक करून या गोष्टी बदलून बघा.

दाढी करताना वस्तरा किंवा रेझर दाढीच्या उलट्या बाजूने आणि जोरात दाबून फिरवल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात म्हणून दाढी करताना या गोष्टींची काळजी घ्या.

दाढी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी दाढी करायच्या आधी गरम पाण्याने किंवा अँन्टी सेप्टिक लिक्विड मध्ये बुडवून निर्जंतुक करूनच वापरा. आपल्याला दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येत असल्यास कोणकोणते घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page